shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : शहराबाहेर होणार नवे कारागृह; शंभूराज देसाईंनी प्रस्ताव देण्याची केली सूचना

जिल्हा कारागृहाची District Jail पहाणी करताना त्यांनी अधिकाऱ्यांना officers सूचना केल्या. सध्याच्या कारागृहात काही सुधारणा करण्यासाठी निधी देण्याबाबत त्यांनी माहिती घेतली.

Umesh Bambare-Patil

सातारा : सातारा जिल्हा कारागृहात बंद्यांना जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे सातारा शहरानजीक नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा कारागृह प्रशासनाने सादर करावा, अशी सूचना राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी सातारा जिल्हा कारागृहाची पहाणी केली. त्यावेळी श्री. देसाई बोलत होते. या पहाणी प्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे आदी उपस्थित होते.

जिल्हा कारागृहाची पहाणी करताना त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सध्याच्या कारागृहात काही सुधारणा करण्यासाठी निधी देण्याबाबत त्यांनी माहिती घेतली. तटभिंतीची उंची वाढविणे, कारागृहातील सर्व बॅरेक, स्वयंपाकगृह व कार्यालयावरचे पत्रे बदलणे, संरक्षक भिंतीची दुरुस्ती, अंतर्गत गटर लाईनचे काम, पाकगृहाचे नुतनीकरण यासह अन्य सुविधांसाठी निधी देण्यात येईल, अशी ग्वाही देवून कारागृह अंत्यत नेटके व स्वच्छ ठेवल्याबद्दल पालकमंत्री श्री. देसाई यांनी समाधान व्यक्त केले.

मध्यंतरी खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा कारागृह शहराबाहेर हालविण्याबाबत सूचना केली होती. त्यासाठी त्यांनी क्षेत्रमाहुली येथील जागेची पहाणी केली होती. कारागृहामुळे सातारा शहराच्या विकासाला खीळ बसत होती, त्यामुळे हे कारागृह शहराबाहेर हालविण्याची सूचना त्यांनी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT