Devendra Fadnavis, Neeta Kelkar
Devendra Fadnavis, Neeta Kelkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'बाबरी पाडताना देवेंद्र फडणवीस तेथेच होते, त्याला मी साक्षीदार आहे...'

सरकारनामा ब्यूरो

सांगली : बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडला गेला त्यावेळी सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तेथे हजर होते. मी त्याची साक्षी आहे, माझ्यासोबत अनेक सांगलीकर कारसेवक त्याचे साक्षी आहेत, असे भाजपच्या (Bjp) प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर (Neeta Kelkar) यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे. पुण्याचे भाजपचे खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या विहिनबाईंनी फडणवीसांची साक्ष दिली आहे.

फडणवीस यांनी बाबरी पाडायला मी गेलो होतो, असे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी 'ते खोटं बोलत आहेत', अशी टीका केली होती. त्याला केळकर यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी या संदर्भात पत्रक काढले आहे. त्यामध्ये केळकर म्हणाल्या की ''बाबरी ढाचा पडताना देशातून आबाल वृद्ध आयोध्या नगरीत आले होते. तीस वर्षापूर्वी लाखो कारसेवक 'रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनायेंगे'चा नारा देत शरयू नदीकाठी जमले होते. सतरा, अठरा वर्षाच्या कोठारी बंधूंचे बलिदान जयंतरावांना आठवत नसेल, असेही केळकर म्हणाल्या. त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या करिअरची चिंता केली असती तर त्यांना कारसेवेला पाठवले नसते, असा टोलाही त्यांनी लगावला.

आमची अस्मिता ज्यांना आठवत नाही ते बाबराचे वंशज असावेत. धर्माभिमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाला शिकवला. जगात कर्तृत्ववान आणि खंबीर कणखर पंतप्रधान बनले. महागाई व गरिबीवर राज्यातील मंत्र्यांनी बोलू नये. मुख्यमंत्र्यांना सांगूनही अजून पेट्रोल व डिझेलवरचे कर कमी केले नाहीत. मंत्री तुरुंगात आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्य अंधकारात आहे. यावर जयंतरावांनी फडणवीस यांच्याशी गप्पा माराव्यात. तुमच्या सरकारचा तिहेरी ढाचा देवेंद्र फडणवीस यांच्या हातूनच पडणार, असल्याचेही केळकर यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT