Nitesh Rane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nitesh Rane : "शेवटची संधी, नाहीतर बसा बोंबलत; निधी देणारच नाही"

Nitesh Rane Warns Uddhav Thackeray Shivsena : काही दिवसांपूर्वीच राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटाच्या सरपंचांना निधी देणार नाही, असा इशारा दिला होता.

Aslam Shanedivan

Sawantwadi News : काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी देणार नाही. निधी हवा असेल तर भाजपमध्ये या असा इशारा दिली होता राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला होता. त्यांनी आता पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या सरपंचांना निधी देणार नाही. आत्ताच वेळ आहे. भाजपमध्ये या नाहीतर बसा बोंबलत असे वक्तव्य केलं आहे. यामुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या सरपंचांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण तयार झाले असून इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था त्यांची झाली आहे.

नितेश राणे येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या संघटन पर्व बैठकीला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी सावंतवाडी मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी जाहीर प्रवेश केला.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या-ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले त्यांनी संधी दिली जाणार अशी घोषणा नितेश राणे यांनी यावेळी केली. तर येथून पुढे जिल्ह्यात फक्त भाजपच दिसेल असे काम करा, सावंतवाडी मतदारसंघातील गावागावात भाजप पक्ष वाढविण्यासाठी काम करा, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. सावंतवाडी तालुका नेहमीच जिल्ह्यात नंबर वन राहिला असून पालकमंत्री म्हणून सर्व ताकद मी देईन अशी ग्वाही यावेळी भाजप कार्यकर्त्यांना नितेश राणे यांनी दिली आहे.

नितेश राणे यांनी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, ते मुख्यमंत्री असताना आमच्यावर अन्याय केला. मविआच्या काळात अनेक अनुभव आपण घेतले असून फडणवीस यांनी सुरू केलेले अनेक प्रकल्प स्थगित करण्यात आले. आमच्या लोकांना जेलमध्ये टाकले. आता जेल दाखवायचं काम आम्ही करू. त्यांच्या कर्जाची परतफेड व्याजासह करू, असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी ठाकरेंना दिला आहे.

तर आता जिल्ह्याचा पालकमंत्री मी असून आता काहीजण आपली मालमत्ता विकून गोव्याकडे निघाले आहेत. पण तेथेही मुख्यमंत्री भाजपचाच आहे, हे कोणी विसरू नये. तर आता ठाकरेंची शिवसेना व महाविकास आघाडीच प्रत्येक गाव आपण टार्गेट करणार असून येत्या काळात शतप्रतिशत भाजप जिल्ह्यात दिसेल.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळणार नाही अशी तजवीज करू असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. तर आता पालकमंत्री भाजपचा असल्याने पहिले प्राधान्य भाजपलाच असेल. मविआच्या सरपंचांना निधी नाही. ठाकरेंच्या सरपंचांना निधी नाही. याबाबत मला कोणच विचारणारं नाही. पक्ष वाढवायचे अधिकार आम्हाला आहेत.

नविन आर्थिक वर्षात सरपंचांची यादी मी घेऊन मी बसणार आहे. ठाकरे शिवसेनेला शुन्य टक्के निधी देणार हे निश्चित. खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान हे भाजपचे आहेत हे कुणीही विसरू नये. मग कळेल आपण उद्धवसेनेत थांबून किती चूक केलीय. त्यामुळे आत्ताच वेळ आहे. निर्णय घ्या नाहीतर... , असाही इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT