Shambhuraj Desai, Satyajitsinh Patankar Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पाटणमध्ये ना पक्ष, ना व्होट बँक : शंभुराजे बंडखोरीनंतरही 2024 साठी निश्चिंत आहेत

Shambhuraj Desai : देसाई आणि पाटणकर हे दोन्ही गट पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात.

सरकारनामा ब्यूरो

कराड : राज्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे अनेक ठिकाणचे राजकीय समिकरणं बदलली आहेत. मात्र, पाटण विधानसभा मतदारसंघात (Patan Assembly constituency) फारसा काही बदल बघायना मिळत नाही. या मतदारसंघात ना पक्ष ना व्होट बँक चालत असून येथे देसाई आणि पाटणकर या दोन गटातच टक्कर बघायला मिळते. याचमुळे शिवसेना (Shivsena) नेते आणि राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी निश्चिंत आहेत.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यानंतर या मतदारसंघावर 2004 पर्यंत राष्ट्रवादीचे (NCP) नेते विक्रमसिंह पाटणकर यांचे वर्चस्व होते. मात्र, त्यानंतर 2009 मधील निसटता पराभव वगळता देसाई यांचाच या मतदारसंघावर दबदबा राहिला आहे. देसाई आणि पाटणकर हे दोन्ही गट पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. (Shambhuraj Desai, Satyajitsinh Patankar Latest Marathi News)

या मतदारसंघात सर्वप्रथम 2004 साली देसाई यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी आघाडी सरकारमधील तत्कालीन मंत्री विक्रमसिंह पाटणकरांचा 5 हजार 851 मतांनी पराभव देसाई यांनी केला होता. या निवडणुकीत त्यांना 72 हजार 214 मते मिळाली होती. तर विक्रमसिंह पाटणकरांना 66 हजार 369 मते मिळाली होती. तर त्यानंतर 2009 साली विक्रमसिंह पाटणकर यांनी बाजी मारत चुरशीच्या लढतीत केवळ 580 मतांनी देसाई यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत पाटणकरांना 87 हजार 917 तर शंभूराज देसाईंना 87 हजार 337 मते मिळाली होती.

2014 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जागेवर त्यांचे पुत्र सत्यजित पाटणकर यांनी येथून निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीतही देसाई यांनी 1 लाख 4 हजार 95 मते मिळवत सत्यजितसिंह पाटणकरांचा पराभव केला. देसाई यांनी 18 हजार 951 मतांनी हा विजय मिळवला होता. यामुळे आतापर्यंतचा पाटण विधानसभा मतदारसंघातील देसाईंचा व पाटणकर गटातील सर्वात मोठा विजय ठरला होता.

यानंतर 2019 ला देसाईंनी पुन्हा एकदा सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी 1 लाख 6 हजार 266 तर सत्यजितसिंह पाटणकर यांना 92 हजार 91 मते मिळाली. मात्र, या निवडणुकीत विजयाचे अंतर 14 हजार 175 इतके असले तरी देसाई व सत्यजितसिंह पाटणकर यांना 2014 च्या तुलनेत अधिक मते मिळाली होती.

दरम्यान, पाटण तालुक्यात देसाई आणि पाटणकर हे दोन्ही गट राजकीय द़ृष्ट्या प्रबळ असून या दोन गटापुढे ना पक्ष चालतो, ना व्होट बँक असाच इतिहास आहे. प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटणकर गटाशी संघर्ष करावा लागणार्‍या शंभूराज देसाईंना मात्र, महाविकास आघाडीमुळे मागील अडीच वर्षांत आक्रमक भूमिका घेता येत नव्हती. त अशीच अवस्था राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाची सुद्धा झाली होती. मात्र आता बंडखोरी करून देसाई हे शिंदे गटासोबत गेल्याने पुन्हा हे दोन्ही गट एकमेकाविरूद्ध आक्रमक होणार, हे निश्चित आहे. तर जवळ आलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा या दोन्ही गटात संघर्ष बघायला मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT