jayshree jadhav
jayshree jadhav  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

"आमदार जयश्री जाधव यांचे हार्दिक अभिनंदन" : कोल्हापुरात निकालापूर्वीच लागले बॅनर

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (१२ एप्रिल) मतदान पार पडल्यानंतर आज या मतांची मोजणी पार पडत आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. एकूण २६ फेऱ्यांमध्ये या मतांची मोजणी होणार असून सध्या पाचव्या फेरीची मोजणी पूर्ण झाली आहे.

पाचव्या फेरीनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना २२ हजार ६८१ मत मिळाली आहेत. तर भाजपच्या सत्यजित कदम यांना १५ हजार ९३३ मत मिळाली आहेत. त्यामुळे जयश्री जाधव या ६ हजार ७४८ मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या चाक फेऱ्यांच्या अखेरीही काँग्रेसच्या जयश्री जाधव याच आघाडीवर राहिल्या आहेत. दरम्यान १२ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. विधानसभा पोटनिवडणुकीच्या या जागेसाठी सुमारे ६० टक्के मतदान झाले होते.

एकाबाजूला ही मतमोजणी सुरु असून निकाल येण्यास अद्याप तीन तास आहेत. त्यापूर्वीच कोल्हापूर शहराच्या अनेक भागांमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स देखील लागले आहेत. या बॅनरवर काँग्रेस नेते आणि कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा उल्लेख किंगमेकर असा करण्यात आला आहे. तर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव आणि आमदार ऋतुराज पाटील यांचाही फोटो या बॅनरवर दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT