Sushma Andhare, Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : ललित पाटलांशी संबंध नाही; अंधारेंवर कायदेशीर कारवाई करणार : शंभूराज देसाई

Umesh Bambare-Patil

Satara Political News : ललित पाटील प्रकरणाशी माझा तीळ मात्र संबंध नाही. त्यामुळे बेजबाबदार वक्तव्य करून अंधारे समाजात माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करीत आहेत. त्यांनी केलेलं वक्तव्य 24 तासांत मागे घ्यावे, अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे, असा इशारा सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी केलेल्या आरोपावरून सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांच्याशी आज पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी देसाई यांनी अंधारे यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.

मंत्री देसाई म्हणाले, सुषमा अंधारे यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. ललित पाटील प्रकरणाशी माझा तीळ मात्र संबंध नाही. त्यामुळे बेजबाबदार वक्तव्य करून त्या समाजात माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करीत आहेत.

त्यांच्यावर लवकरच माझ्या कायदेशीर सल्लागाराशी चर्चा करून पुढची कायदेशीर कारवाई करणार आहे. दरम्यान, आम्हाला बदनाम करण्याचे काम तत्काळ अंधारेंनी थांबवावे, असेही मंत्री देसाईंनी स्पष्ट केले. Maharashtra Political News

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT