पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची (Vitthal Sugar Factory) सत्ता ताब्यात येताच अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijit Patil) यांनी कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगिरथ भालके (Bhagirath Bhalke), राष्ट्रवादीचे पंढरपूर (Pandharpur) तालुकाध्यक्ष विजययिंह देशमुख यांना दणका दिला आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या थकीत सुमारे १२ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष, संचालकांसह जवळपास ४०० लोकांना नोटिसा पाठवल्या आहेत. यामुळे पंढरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Notice for recovery of 12 crores to former directors of Vitthal Sugar Factory)
नोटिसा पाठविलेल्यांमध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष सुळे यांच्यासह माजी संचालकांचा समावेश आहे. या नोटिशामुळे अगोदरच्या अडचणीत सापडलेल्या भालके गटाला धक्का मानला जात आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांशी संलग्न असलेल्या विठ्ठल सर्व सेवा संघातून मोठ्या प्रमाणावर रक्कम उचलून नेल्या आहेत. या रक्कमा संबंधित लोकांकडे मागील अनेक वर्षांपासून थकल्या आहेत. सध्या कारखान्यावर सुमारे सहाशे कोटींचे कर्ज आहे. अलीकडेच कारखान्याची निवडणूक पार पडली. यामध्ये सत्ताधारी भगिरथ भालके-कल्याणराव काळे गटाचा पराभव झाला. यामध्ये डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल विजयी झाले आहे. ता. २१ जुलै रोजी कारखान्याच्या अध्यक्षपदी अभिजित पाटील यांची निवड झाली आहे. त्यानंतर अभिजीत पाटील यांनी कारखाना सुरू करण्यासाठी कंबर कसली आहे. थकबाकी वसुलीचा एक भाग म्हणून कारखान्याने थकबाकी वसुलीची मोहिम हाती घेतली आहे.
मागील अनेक वर्षांपासून थकबाकीदार असलेले माजी अध्यक्षांसह संचालकांना थकबाकी भरण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. थकबाकी न भरणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारीही कारखान्याने सुरू केल्याची माहिती अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.