NTPC Solapur
NTPC Solapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अडीच लाखांची लाच घेताना NTPC च्या मजूर पुरवठा कंपनी अधिकाऱ्यास CBI कडून अटक

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : सोलापुरातील (Solapur) एनटीपीसीला (राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्रकल्प NTPC) मजूर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून अडीच लाख रुपयांची लाच घेताना मुख्य मजूर ठेकेदार कंपनीचा अधिकारी सीबीआयच्या (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग CBI) जाळ्यात अडकला आहे. सीबीआयकडून त्याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक ठेकेदारांनी याबाबत सीबीआयकडे तक्रार केली होती. (NTPC labor supply company officer arrested by CBI for accepting bribe of 2.5 lakhs)

गोविंदकुमार असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या एनटीपीसी कंपनीच्या मुख्य मजूर ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. कंपनीकडे असलेली पाच लाखांची अनामत रक्कम परत करण्यासाठी गोविंदकुमार याने मजूर ठेकेदाराकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती.

सोलापूर येथील एनटीपीसी कंपनीला मुख्य मजूर पुरवठा करणारी यूपीएल कंपनीच्या अधिकाऱ्याविरोधात स्थानिक मजूर पुरवठा ठेकेदाराने सीबीआयकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने सापळा रचून गोविंदकुमार याला रंगेहाथ पकडून अटक केली आहे. या प्रकारामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. तसेच, लाचेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कंपनीला स्थानिक मजूर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराची यूपीएल कंपनीकडे पाच लाख रुपयांची अनामत रक्कम जमा होती. ती रक्कम परत करण्यासाठी ‘यूपीएल’ कंपनीचा अधिकारी गोविंदकुमारने अडीच लाख रुपयांची लाच ठेकेदाराकडे मागितली होती, त्यामुळे स्थानिक ठेकेदारानी गोविंदकुमार याच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानंतर मजूर ठेकेदाराकडून लाच घेताना मुख्य मजूर ठेकेदार कंपनीचा अधिकारी गोविंदकुमार हा पैसे घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT