-रूपेश कदम
Maan News : माणची माती बौध्दिक क्षेत्रात कसदार असल्याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. दहिवडीचा सुपुत्र ओंकार गुंडगे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ३८० वा क्रमांक मिळवून यशाला गवसणी घातली. ओंकारचे हे यश कुटुंबीयांसह मित्रपरिवाराने फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत साजरे केले.
ओंकार हा सातारा जिल्हा परिषदेचे Satara Zilla Parishad माजी शिक्षण सभापती अॅड. भास्करराव गुंडगे यांचा पुतण्या व येथील प्रथितयश कापड दुकानदार राजेंद्र गुंडगे यांचा सुपुत्र आहे. ओंकारचे माध्यमिक शिक्षण मेरीमाता इंग्लिश स्कूल मेडीयम म्हसवड येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण रुईया कॉलेज मुंबई Mumbai येथे झाले.
तर आय.एल.एस.लॉ कॉलेज पुणे येथून त्याने बी.एस.एल. एल.एल.बी. ही पदवी २०१७ साली मिळवली. या पदवीच्या तिसऱ्या वर्षी तो विद्यापीठात प्रथम आला होता. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी तो दिल्ली येथे गेला.
चार प्रयत्नात पुर्व परीक्षा पास होवूनही मुख्य परीक्षेत त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र पाचव्या प्रयत्नात मुलाखतीसाठी पात्र होवून देशात ३८० वा आला. या यशानंतर ओंकार वर अभिनंदनाचा वर्षाव होत असून अनेक मान्यवरांनी भेट घेवून त्याला व कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.