Jaykumar Gore  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Man-Khatav Politic's : अरे माझ्या बापाचा दहावासुद्धा विरोधकांनी करू दिला नाही; जयकुमार गोरेंनी व्यक्त केली मनातील खंत

Jaykumar Gore's Regret : हा जयकुमार गोरे कधीही कोणावर चुकीची कारवाई करणार नाही. सत्ता असो अथवा नसो. कधीही कोणाच्या वाळलेल्या पाचोळ्यावर पाय देणार नाही. ज्या ज्या लोकांनी अडचणी आणल्या, त्यांनाही त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे.

Vijaykumar Dudhale

Satara, 12 May : मी मंत्री झाल्याचेही विरोधकांना सहन झालं नाही. दुश्मनाच्या घरी गेल्यावर त्या कुटुंबाच्या किंवा त्या व्यक्तीच्या दु:खात आपण सहभागी होतो. अरे माझ्या बापाचा दहावासुद्धा विरोधकांनी करू दिला नाही. दहाव्याच्या आधी जयकुमार गोरेच्या विरोधात षडयंत्र रचलं आणि जयकुमार गोरेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, अशी खंत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बोलून दाखवली.

दहिवडी येथील कार्यक्रमात ग्रामविकस मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. ती दाखवताना त्यांनी संपूर्ण इतिहासच काढला. जिल्हा परिषद निवडणुकीपासून पहिली आमदारकी आणि मंत्रिपदापर्यंत पोहोचताना झालेल्या त्रासाचा गोरेंनी पाढाच वाचून दाखवला.

ते म्हणाले, मी राजकारणात पहिल्या दिवसांपासून संघर्ष केला आहे. जिल्हा परिषद सदस्य होताना संघर्ष केला. पहिल्यांदा आमदार झालो, त्यावेळीही संघर्ष केला. अशी एक वेळ नाही की, मी संघर्ष केला नाही. निवडणूक लागली आणि माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाही, असं कधी घडलचं नाही. पण, सगळ्या परिस्थितीतून त्या परमेश्वराने मला मार्ग काढून दिला आणि लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. अनेक अडचणींवर मात करून संकटांच्या छातीवर उभा राहून हा जयकुमार गोरे पुढे गेला. पण, जाता जाता अनेकांना जेलमध्ये जायची भीती वाटायला लागली आहे.

हा जयकुमार गोरे कधीही कोणावर चुकीची कारवाई करणार नाही. सत्ता असो अथवा नसो. कधीही कोणाच्या वाळलेल्या पाचोळ्यावर पाय देणार नाही. ज्या ज्या लोकांनी अडचणी आणल्या, त्यांनाही त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे, पण ते स्वतःच त्रास करून घेतात. मी तर काय करू. कोण इकउं पळतंय, कोण तिकडं जातंय. केस आहे की नाही, याचीही माहिती घेत नाहीत गडी. ही परिस्थिती का निर्माण झाली, असा सवालही गोरे यांनी उपस्थित केला.

ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, मी मंत्री झाल्याचेही त्यांना सहन झालं नाही. दुश्मनाच्या घरी गेल्यावर त्या कुटुंबाच्या दु:खात आपण राहतो किंवा त्या व्यक्तीच्या दु:खात आपण राहतो. अरे माझ्या बापाचा दहावासुद्धा विरोधकांनी करू दिला नाही. दहाव्याच्या आधी जयकुमार गोरेच्या विरोधात षडयंत्र रचलं आणि जयकुमार गोरेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. किमान दहा दिवस होईपर्यंत वाट पाहायची. आणखी तीन दिवस वाट पाहिली असते काय बिघडलं असतं का? तीन दिवसांनी हे षडयंत्र करता आलं असता ना?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT