NCP
NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अन्यथा, अकोले नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची स्वबळावर लढण्याची तयारी

शांताराम काळे

अकोले ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात अकोले नगरपंचायतीचाही समावेश आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) विरूद्ध भाजप ( BJP ) सरळ लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस बरोबर न आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. Otherwise, the NCP is ready to fight on its own in the Akole Nagar Panchayat elections

अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात काल ( मंगळवारी ) इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुक उमेदवारांनी आपल्या शिष्टमंडळासह गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, आमदार डॉ. किरण लहामटे ( Kiran Lahamte ) , जेष्ठ नेते सीताराम गायकर, अशोकराव भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, महिला अध्यक्षा स्वाती शेणकर, संपतराव नाईकवाडी आदींसह नेते उपस्थित होते.

संदीप वर्पे म्हणाले, की ज्या उमेदवारांना जनमत असेल त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली जाईल असे मत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केले. अकोले नगरपंचायत निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक असून त्यास यश येईन अशी खात्री आहे. महाविकास आघाडी न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस सर्व 17 प्रभागात उमेदवार उभे करू असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी केले.

यावेळी सीताराम गायकर म्हणाले की,राज्यात महाविकास आघाडी आल्याने तालुक्यातही महाविकास आघाडी झाल्यास विकास कामासाठी निधी आणणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र यावे. प्रत्येक प्रभागातील त्या त्या पक्षाची ताकद पाहून उमेदवारी देता येणे शक्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व्हावी, असे आवाहन केले.

अशोक भांगरे यांनी सांगितले, की अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्व 17 प्रभागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 17 उमेदवार देऊ शकतो. परंतु महाविकास आघाडी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बहुमताने निवडून आले असल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे चित्र असतांना राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवावी असे मत सर्व सामान्य कार्यकर्ते अपेक्षा करीत आहे.

अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप, मनसे हे स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. शिवसेना मात्र महाविकास आघाडीच्या तयारीत असली तरी सन्मानाने जागा मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या सर्व बाबींचा विचार करता येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडी होईल किंवा नाही याचे चित्र स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT