P N Patil Latest News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

P N Patil Latest News Update : साहेब! लवकर बरे व्हा, करवीरवासियांनी घातलं साकडं

Rahul Gadkar

Kolhapur Latest Update : करवीर विधानसभा मतदारसंघाचे (Karvir Vidhansabha Loksabha) आमदार पी.एन.पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर कोल्हापुरातील (Kolhapur) खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक वर्ष राजकारणात रुळलेल्या पाटील यांचे गावोगावी ऋणानुबंध कायम आहेत. करवीर विधानसभा क्षेत्रासह आजूबाजूच्या गाव गाड्यातील माणसं जपणारा माणूस म्हणून पाटील (P N Patil) त्यांच्याकडे आदराने पाहिल जाते. P N Patil Latest News 

कार्यकर्ता जपण्याबरोबरच पक्षाशी एकनिष्ठ कसे असावे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार पी. एन. पाटील. (P N Patil Health update) असा हा समाजाशी नाळ जोडलेल्या आमदारांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जीवाला जीव देणारी माणसं आणि कार्यकर्त्यांनी रात्रभर रुग्णालयाच्या बाहेर रात्र जागून काढली आहे. इतकच नव्हे तर देवाच्या चरणी प्रार्थना सुद्धा सुरू आहे.

करवीर विधानसभा मतदारसंघाचे (Karvir Vidhansabha Constituency) आमदार पी. एन. पाटील हे राजारामपुरी येथील राहत्या घरी पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर कोल्हापुरातील (Kolhapur) खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी परिस्थिती चिंताजनक आहे, असे डॉक्टरांचे म्हणणं आहे. ही बातमी गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला मन हेलावून टाकणारी आहे. कारण आमदार पी. एन. पाटील (P.N, Patil ) यांचे सर्व पक्षांसोबत असणारे घनिष्ठ संबंध होय. कार्यकर्ता जपणारा माणूस म्हणून पी. एन. पाटील यांची ओळख आहे. त्यांच्या प्रेमापोटी पाटील हे लवकर बरे व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांनी प्रार्थना सुरू केली आहे. P N Patil Admitted Hospital In Kolhapur

इतकच नव्हे तर सोशल मीडियामध्ये (Socia Media) सुद्धा 'जनतेचा पांडुरंग', 'साहेब तुम्ही लवकर बरे व्हा' असेच व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सुद्धा मोबाईलच्या स्क्रीनवर लागली आहेत. इंस्टाग्राम instagram वरून सुद्धा साहेबांची तब्येत लवकर बरी व्हावी अशा स्टोरीज सुरु आहेत. गेल्या दोन दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप (Whatapp) वर अनेकजण अफवा पसरवत आहेत. मात्र त्याला उत्तर देत साहेबांची प्रकृती स्थिर आहे असा धीर देण्याचे काम कार्यकर्त्याकडून सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT