Kartiki Yatra News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kartik Yatra 2023 : कार्तिकी यात्रेसाठी अजितदादा, फडणवीसांना विठुरायाचे दार बंद; मराठा समाजाच्या भावना तीव्र

Pandharpur Latest News : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे.

Mangesh Mahale

Ajit Pawar & Devendra Fadnavis News : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला असून, आंदोलक रस्त्यावर उतरून पुढाऱ्यांच्या गाड्या अडवत आहेत, तर दुसरीकडे आता नेत्यांच्या गावबंदीनंतर मंदिरबंदी करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने घेतला आहे. येत्या कार्तिकी यात्रेला पंढरपूरला विठ्ठलाच्या महापूजेला आमदार, खासदार, मंत्र्यांना मराठा समाजाने बंदी घातली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मंदिर प्रशासनाला दिले आहे.

कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता वारकऱ्यांच्या हस्ते करावी, असे पत्र सकल मराठा मोर्चाने मंदिर समितीला दिले आहे. कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांना मराठा सकल समाजाने बंदी घातली आहे. "जे मंत्री, उपमुख्यमंत्री महापूजेला येतील त्यांच्या तोंडाला काळे फासू," असा इशारा देण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या हस्ते कार्तिकी यात्रेची महापूजा करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सकल मराठा समाजाचे मंदिर प्रशासनाला पत्र

वारकऱ्यांच्या हस्ते पूजा करा

मनोज जरांगे यांच्या बेमुदत आज चौथा दिवस आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. वारकऱ्यांच्या हस्ते पूजा करा, आरक्षण न देता कोणी येण्याचा प्रयत्न केल्यास काळे फासू, असा सज्जड दम सकल मराठा समाजाने दिला आहे.

सरकारच्या विरोधात घोषणाबाजी...

बीडच्या धारूरमध्ये मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार निर्णय घेत नसल्याने धारूरमधील मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

कोंडी गावात उपोषणाला सुरुवात

सोलापूरच्या कोंडी गावातील मराठा बांधवांनी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. मागच्या 35 दिवसांपासून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात सहभाग व्हावा, या मागणीसाठी हे मराठा बांधव साखळी उपोषण करीत होते. मात्र, आजपासून या गावातील मराठा बांधवांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यापुढील आंदोलनाची दिशा ही मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील, त्यानुसार ठरवण्यात येईल, असे आंदोलकांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT