ZP election  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ZP Elections 2026: कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलायच्या का? झेडपीतही राजकीय कुटुंबांचा कब्जा; 'घराणेशाही पॅटर्न' मुळे कार्यकर्त्यांच्या इच्छेवर पाणी

Pandharpur Zilla Parishad election: कार्यकर्त्यांचे तिकीट कापले जाते. नेत्यांच्या घरातील सदस्याला निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जाते. तेव्हा 'आम्ही कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायचा का? असा सवाल आता निष्ठावंत कार्यकर्ते करु लागले आहे.

Mangesh Mahale

Pandharpur Zilla Parishad elections news: स्थानिक निवडणुका अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपालिका महानगरपालिका , ग्रामपंचायती या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. मात्र सध्या या सर्व निवडणुकांमध्ये पुढाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीलाच रिंगणामध्ये उतरवल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

महापालिका निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांचा बोलबाला होता, आयुष्यभर पक्षासाठी लढणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना मात्र स्थानिक निवडणुकीत डावलण्यात आले होते. आपल्या नेत्याला सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार,मंत्री करण्यासाठी कार्यकर्ता अहोरात्र झटत असतो. पण जेव्हा त्याला उमेदवारी देण्याचे वेळ येते तेव्हा मात्र दुर्लक्ष करीत नेतेमंडळी 'घराणेशाही'ला पसंती देण्यात येते.

अनेक वर्ष जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे तिकीट कापले जाते. नेत्यांच्या घरातील सदस्याला निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जाते. तेव्हा 'आम्ही कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायचा का? असा सवाल आता निष्ठावंत कार्यकर्ते करु लागले आहे. घराणेशाहीच्या पॅटर्नमुळे अनेक कार्यकर्त्यांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती सुरु आहे. अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहे.

पंढरपुरात अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कुटुंबातील व्यक्तींना उतरवले आहे. राजकारणात मातब्बर घराणे अशी ओळख असलेल्या सर्वच कुटुंबांनी आपल्याच घरातील व्यक्तीला तिकीट देण्याचा चंग बांधल्याचे चित्र दिसते.

पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील भालके गटाने स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या सुनबाई डॉक्टर प्रणिता ताई भालके यांना उमेदवारी देऊन निवडून आणले होते. आता तोच भालके पॅटर्न जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील दिसत असल्याचे बोलले जाते.

भोसे गटातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय यशवंत भाऊ पाटील यांच्या सुनबाई प्रफुल्लता पाटील यांनी काल (सोमवारी) आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

स्वर्गीय वसंतदादा काळे यांच्या सुनबाई मोनिका समाधान काळे यांनी वाखरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पंढरपूरचे माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे नातू प्रणव परिचारक हे करकंब जिल्हा परिषद गटातून इच्छुक असल्याचे समजते. ते भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. गोपाळपूर गटातून स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या सुनबाई निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT