Voters queue outside polling booths in Pandharpur taluka as Zilla Parishad and Panchayat Samiti elections witness high voter engagement amid minor incidents. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur ZP Election : आमदार अभिजीत पाटलांचा भाऊ अन् भाजप उमेदवार यांच्यात खडाजंगी; पंढरपूर तालुक्यात चुरशीने मतदान

Pandharpur Taluka Voting : पंढरपूर तालुक्यात झेडपी व पंचायत समिती निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. किरकोळ घटनांनंतरही पोलिस हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि मतदान शांततेत पार पडले.

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur News : तब्बल आठ ते नऊ वर्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज पंढरपूर तालुक्यात चुरशीने मतदान झाले. भोसे येथे अज्ञाताने सकाळी मोटारसायकल पेटवली तर करकंबमध्ये आमदार अभिजित पाटील यांचे बंधू अमर पाटील आणि भाजप उमेदवार आदिनाथ देशमुख यांच्यात खडाजंगी झाली.

यासह अन्य गावातील किरकोळ वादाचे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्ते दिवसभर धावाधाव करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

सकाळी सुरवातीला मतदार मतदानासाठी बाहेर पडले, दुपारी मात्र अनेक ठिकाणी मतदान केंद्रे ओस पडली. दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी 30 ते 32 टक्के इतके मतदान झाले होते. दुपार नंतर मात्र शेतातील कामे संपवून मतदार मतदानासाठी बाहेर पडले. एकाच वेळी मतदार आल्याने मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे ही दिसून आले. सर्वसाधारण असलेल्या करकंब, भोसे, गोपाळपूर, वाखरी व कासेगाव जिल्हा परिषद गटामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत होता.

तथापि राखीव असलेल्या गटात मात्र शांतता दिसून आली. सकाळी भोसे येथे मतदान सुरू होण्यापूर्वी अज्ञाताने मोटारसायकल जाळली. यानंतर गावात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी येऊन पाहणी केली. दुपारी करकंब येथे भाजपचे उमेदवार आदिनाथ देशमुख आणि आमदार अभिजित पाटील यांचे बंधू अमर पाटील यांच्यात शाब्दीक खडाजंगी झाली. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. त्यातूनच कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. त्यानंतर मतदान केंद्राबाहेर काही वेळ तणाव निर्माण झाला होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थती नियंत्रणात ठेवली.

प्रमुख नेत्यांनी केले मतदान

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी आपापल्या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये आमदार अभिजित पाटील यांनी देगाव येथे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी खर्डी येथे तर कल्याणराव काळे यांनी वाडीकुरोली येथे मतदानाचा हक्क बजावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT