Pankaja Munde -Udayanraje Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाच्या वक्तव्यावर उदयनराजे म्हणाले...

मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे या नाराज झाल्या आहेत. पण, त्यांनी आपली नाराजी वेगळ्या पद्धतीने दर्शविली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये समावेश न झाल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी वेगळ्या पद्धतीने नाराजी व्यक्ती केली होती. माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल, असं वक्तव्य मुंडे यांनी केले होते. त्यावर भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे (Udayanraje) यांनी प्रतिक्रिया दिली असून ‘लायकी सर्वांचीच असते,’ असे त्यांनी म्हटले आहे. (Pankaja Munde on ministerial statement, Udayanraje said...)

खासदार उदयनराजे यांनी आज (ता. १२ ऑगस्ट) कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर वरील उत्तर दिले. ते म्हणाले की, मंत्रिदासाठी सगळ्यांची लायकी (पात्रता) असते. लायकी नाही असं कसं. त्या काय बोलल्या आहेत, ते मला माहिती नाही. पण, सर्वांची लायकी असते.

राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात भारतीय जनता पक्षाकडून माजी मंत्री तथा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना स्थान मिळालेले नाही. त्यासंदर्भात मुंडे समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून प्रत्येकी नऊ जणांनाच संधी देण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली अपात्रतेसंदर्भातील सुनावणी, विधानसभेचे अधिवेशन, अध्यक्ष निवडीसंदर्भात वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून मोजक्याच आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. पण, त्यातून शिंदे गटातील आणि भाजपतील आमदारही नाराज झाले आहेत.

पंकजा मुंडेही मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज होणे स्वभाविक आहे. पण, त्यांनी आपली नाराजी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने दर्शविली आहे. ‘माझ्यापेक्षा जास्त पात्रतेच्या लोकांना मंत्रिपद दिलं असेल. माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रीपद दिलं नसेल,’ अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT