Pankaja Munde, Pritam Munde
Pankaja Munde, Pritam Munde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पंकजा मुंडे म्हणाल्या, त्यामुळे आमचे सरकारही खाली बसले

सचिन सातपुते

शेवगाव ( जि. अहमदनगर ) : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांत आहे. यावर पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी आज सूचक वक्तव्य केले. ( Pankaja Munde said, so our government also sat down )

पाथर्डीहून औरंगाबाद येथे जात असताना शेवगाव येथे त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, किसान मोर्चाचे तुषार वैद्य, बापूसाहेब पाटेकर, तालुका सरचिटणीस भीमराज सागडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस गणेश कराड, मयूर हुंडेकरी, कासम शेख, उमेश धस, स्वाभिमानी संघटनेचे दत्तात्रेय फुंदे, बाळासाहेब फटांगडे, नितीन फुंदे, बाळासाहेब डोंगरे आदी प्रमुख उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, एखाद्या पदामुळे व्यक्ती मोठी किंवा लहान होत नाही. पद असो वा नसो; सतत जमिनीवर राहून लोकांमध्ये जाण्याची शिकवण आम्हाला (स्व.) गोपीनाथ मुंडे यांनी दिली. त्यामुळे सत्तेत व कुठल्याही पदावर नसतानाही जाऊ तिथे लोक गर्दी करतात. ही मुंडे साहेबांचीच पुण्याई आहे. परळी मतदारसंघात माझा पराभव झाला, तर मी खाली बसले. त्यामुळे आमचे सरकारही खाली बसले, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला.

त्या पुढे म्हणाल्या, की (स्व.) मुंडे साहेब परळीला आई, तर शेवगाव- पाथर्डीला मावशी मानायचे. त्यामुळे राज्यात मंत्री असताना शेवगाव- पाथर्डी मतदारसंघाला परळीपेक्षाही अधिक निधी दिला. सत्ता होती तेव्हा निधी दिला, आता सत्ता नाही तर वेळ देत आहे. बालमटाकळी येथील दोन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन करण्याची विनंती उपसरपंच तुषार वैद्य यांनी केली. मात्र, राज्यातील इतरही अनेक गावांतून अशी मागणी असल्याने, प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होणार नाही. आगामी काळात त्यासाठी नक्की वेळ देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी शेवगाव तालुका भाजप, जिल्हाध्यक्ष मुंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे व ग्रामस्थांच्या वतीने मुंडे भगिनींचा भव्य सत्कार करण्यात आला. प्रास्तविक जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी, तर सूत्रसंचालन भीमराज सागडे यांनी केले. उद्योजक उदय मुंडे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT