अहमदनगर : अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा समजला जातो. या जिल्ह्याचे विभाजन व्हावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. जिल्हा विभाजन करावे या मागणीचे निवेदन भाजपचे सोशल मीडिया सेल उत्तर नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. या निवेदनाची दखलही मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा विभाजन व नवीन जिल्ह्याचे शिर्डी हे मुख्यालय करण्याचा प्रस्ताव राज्याच्या नगर विकास विभागाकडे असल्याचे सांगितले. या संदर्भात भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी आज सरकारनामाशी बोलताना महत्त्वाचे वक्तव्य केले. Partition of Ahmednagar is necessary! Being a large district, Corona has no control...
राज्यात महायुती सरकारच्या काळात भाजपचे मंत्री राम शिंदे हे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा विभाजनावर भाष्य केले होते. त्यानंतर हा प्रश्न अडगळीत पडला होता. भाजपने आता पुन्हा अहमदनगर जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मी अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव राज्य शासनासमोर मांडला होता मात्र तो होऊ शकला नाही असे सांगत राम शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या कार्यलयाकडून जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठविल्याचे कळते मात्र माझ्या मते अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या प्रस्तावाचा नगर विकास विभागाशी संबंध येत नाही.
ते पुढे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे. क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून अहमदनगर हा राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. त्यामुळे प्रशासनाला नियंत्रण ठेवायलाही अडचणीचे होते. ते कोविड-19 महामारीतही अनेक वेळा सिद्ध झाले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात येत असताना अहमदनगर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत नाही. याला कारण जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून भाजपच्या निवेदनावर आलेल्या उत्तरावर ते म्हणाले, माझ्या माहितीनुसार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महसूल विभाग व राज्याच्या मंत्रिमंडळाने घ्यायचा हा निर्णय आहे. माझ्या वेळेसही जिल्हा प्रशासनाने जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवला होता. मात्र त्यावेळी जिल्हा विभाजन झाले नाही. पण जिल्हा विभाजन झाले पाहिजे, असेही राम शिंदे यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.