Kopargaon Assembly Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ashutosh Kale: आमदार काळेंना मताधिक्य द्या: लोहाटे

Ashutosh Kale: भविष्यात मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार काळे कटिबद्ध

सरकारनामा ब्यूरो

Ashutosh Kale: तालुक्यात कीर्तन सेवा देताना प्रत्येक भागातील अनेक विकासाचे प्रश्न सुटले असल्याचे दिसून येते. शहरात देखील आमदार काळे यांच्या पुढाकारातून अमूलाग्र बदल झालेला आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आमदार काळे यशस्वी झाले आहेत.

त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांना मताधिक्याने निवडून द्यावे, असे प्रतिपादन गणपत महाराज लोहाटे यांनी केले.

गजानननगर येथे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कोपरा सभेत ते बोलत होते. जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. लोहाटे म्हणाले की, मतदारसंघातील सर्वसामन्यांची विकासाची कामे पूर्ण केल्याने आमदार काळे त्या बळावर निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.

परंतु राज्याच्या निवडून येणाऱ्या आमदारांमध्ये सर्वांत जास्त मताधिक्याने निवडून येणाऱ्या पहिल्या दहा आमदारांमध्ये ते असले पाहिजे, एवढे मताधिक्य देण्याचे त्यांनी आवाहन केले.

काळे म्हणाले की, कोरोना महामारीत शासनाच्या मदतीची वाट न पाहता मतदारसंघातील जनतेचा जीव वाचविण्यासाठी आमदार काळे यांनी कोरोन केअर सेंटर उभारले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागाला सर्वतोपरी मदत केली. ऑक्सिजन तुटवडा भरून काढला. हे करताना त्यांना स्वत:ला देखील दोन वेळेस कोरोनाची लागण झाली.

मात्र आपले कर्तव्य बजावण्यात ते मागे राहिले नाहीत. ज्या महिलांनी कोरोना महामारीत आपले सौभाग्य गमविले, त्यांना आपला तीन महिन्यांचा पगार देवून त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. मतदारसंघातील झालेला विकास जनतेसमोर आहे.

मतदारसंघातील सर्वच घटकांसाठी आमदार काळे यांनी मोठे काम केले आहे. भविष्यात देखील मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार काळे कटिबद्ध आहेत. त्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन काळे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT