Radhakrishna Vikhe Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : निळवंडे लाभक्षेत्रातील जनता महायुतीच्या पाठीशी

Radhakrishna Vikhe Patil : खडकेवाके येथे प्रचारार्थ सभा

सरकारनामा ब्यूरो

Radhakrishna Vikhe Patil : निळवंडे धरण अकोल्यात आणि माझ्यावर टीका करण्यासाठी आंदोलने राहात्यात केली जायची. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, यामुळे कालव्यांच्या कामाला अकोलेतून सुरुवात झाली.

कालव्यांची कामे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वितरिकांच्या कामासाठी आठशे कोटी रुपये मंजूर केले. महायुती सरकारमुळेच निळवंडेचे पाणी कालव्यांद्वारे शेतात आले, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.

त्यामुळे निळवंडेच्या लाभक्षेत्रातील जनता महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास महायुतीचे उमेदवार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील खडकेवाके येथे आयोजित सभेत ते बोलत होते. रावसाहेब लावरे, जालिंदर मुरादे, रावसाहेब लावरे, सरपंच संगीता मुरादे, माजी सरपंच सचिन मुरादे आदींनी त्यांचे स्वागत केले. लाडक्या बहि‍णींनी त्यांना औक्षण करून राख्या बांधल्या.

विखे पाटील म्हणाले, की एक रुपयात पीक विमा, सोयाबीन अनुदान आणि लाडकी बहीण योजनेमुळे प्रत्येक शेतकरी आणि शेतमजुराला दिवाळीच्या तोंडावर पैसे मिळाले. शिर्डी विधानसभा मतदारसंघात धुमधडाक्यात दिवाळी साजरी झाली.

महायुती सरकारने जनतेच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. खडकेवाके सारख्या गावात एक हजार लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन ते चार योजनांचा लाभ मिळाला. महायुती सरकारमुळे ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना मिळाली.

शेतकऱ्यांच्या डोक्यावरची वीज बिलाची संपूर्ण थकबाकी माफ झाली. यापुढे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल. याउलट महाविकास आघाडीचे नेत्यांकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यांची अडीच वर्षे राज्यातील सत्ता होती.

त्याकाळात त्यांनी जनतेसाठी किती योजना राबवल्या याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. केवळ टीकाटिपण्णी आणि शिव्याशाप देऊन काहीही साध्य होणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

यावेळी सचिन मुरादे, मनीषा लावरे, नवनाथ मुजमुले, नरेंद्र मुरादे, जालिंदर मुरादे, दीपक गायकवाड आदींची भाषणे झाली. यावेळी बाळासाहेब लावरे, सोमनाथ मुजमुले, रवींद्र सुरासे, रंगनाथ लावरे, गोरक्षनाथ पोकळे, बाबासाहेब मुरादे, संदीप लावरे, मनीषा लावरे, हिराबाई मुरादे, सुभाष यादव, बापूसाहेब मुरादे, गोरक्षनाथ लावरे, राजेंद्र पोकळे, अन्नासाहेब लावरे, बी. टी. लावरे आदी उपस्थित होते.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे, निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रात आले. विहिरींना पाणी वाढल्याने वैरणीची पिके घेता येतील. जिरायत भागातील दूध व्यवसायाला मोठी चालना मिळेल.

वितरीकाच्या कामासाठी विखे पाटलांनी केंद्र सरकारकडून आठशे रुपयांचा निधी आणला. त्यामुळे लवकरच या जिरायत भागाचे रूपांतर बागायत भागात होईल आणि समृध्दी येणार आहे. विखे पाटलांमुळे सुखाचे दिवस आले आहेत.

- सचिन मुरादे, माजी सरपंच, खडकेवाके.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT