Radhakrishna Vikhe Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : बंद गणेश कारखाना का घेतला नाही

Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे यांचा सवाल: विकासाच्या मुद्यावर विरोधक गप्प का?

सरकारनामा ब्यूरो

Radhakrishna Vikhe Patil : गणेश कारखाना बंद होता, त्यावेळी तो चालविण्यासाठी विरोधक का पुढे आले नाहीत? गणेश कारखाना सभासदांच्‍या मालकीचा रहावा, या हेतूने आपण तो चालवायला घेतला होता. आम्ही पुढाकार घेतला नसता, तर त्याचा लिलाव झाला असता.

सभासद वाढविले असते, तर तो आमच्याच ताब्यात राहिला असता, हे विसरू नका. व्यक्तिगत टीका टिप्पणी करता. मात्र, विकासाच्‍या मुद्यावर विरोधक का गप्प राहतात, असा सवाल महायुतीचे उमेदवार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

महायुतीच्या वतीने काल एकरुखे व रांजणगाव खुर्द येथे आयोजित ग्रामस्‍थ आणि पदाधिकाऱ्यांच्‍या बैठकीत ते बोलत होते. या दोन्ही गावांत मोटारसायकल रॅली काढून विखे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. त्यात महिला आणि युवक सहभागी झाले होते.

विखे पाटील म्‍हणाले की, आपल्या शेजारचे नेते आपल्‍या भागात येऊन संभ्रम निर्माण करतात. मंत्री असताना त्यांनी येथे दमडीचाही निधी दिला नाही.

पालकमंत्री या नात्याने संगमनेर तालुक्‍यासाठी आपण राजकारणाआड येऊ न देता निधी दिला. भावनिक मुद्दे उपस्थित करून हे नेते स्‍वत:च्‍या चुका झाकतात.

ते पाटबंधारे मंत्री असताना समन्‍यायी पाणीवाटप कायदा मंजूर झाला. जिल्‍ह्याचे हक्‍काचे पाणी गेले. त्यावर ते बोलत नाहीत. दहशतीचा मुद्दा घेऊन ते संभ्रमीत करू पहात आहेत. मात्र, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही.

महायुती सरकारने घेतलेल्‍या लोकाभिमुख निर्णयांचा लाभ शिर्डी मतदारसंघातील प्रत्‍येकाला झाला आहे. एक रुपयात पीकविमा योजनेपासून ते मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍यात जमा झाले.

वीजबिल माफीचा मोठा निर्णय झाला. लाडकी बहीण योजनेला न्यायालयात जाऊन विरोध आणि पंचसूत्री कार्यक्रमात या योजनेत वाढीव पैसे देण्याचे आश्वासन देतात. लोक त्यांच्या बनवबनवीला फसणार नाहीत.

शिर्डी येथील नियोजित औद्योगिक वसाहतीमुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात मोठी रोजगारनिर्मिती होईल. निळवंडे कालव्याचे काम पूर्ण झाले. वितरिकांच्या कामासाठी केंद्र सरकारने आठशे कोटी रुपये मंजूर केलेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा आपण जनतेच्या सहकार्याने बदलला आहे.

- राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT