Nagar Assembly Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangram Jagtap: शहर विकासासाठी सामर्थ्य दे; संग्राम जगताप यांचे रेणुकामातेला साकडे

Sangram Jagtap: नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान हे मी केलेल्या कामाचे चीज

सरकारनामा ब्यूरो

Sangram Jagtap: गेल्या दहा वर्षांपासून केलेल्या कामांनी नगरकरांची सेवा केली आहे. अशीच सेवा माझ्या हातून भविष्यातही घडावी, यासाठी शहर विकासासठी सामर्थ्य दे, असे साकडे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या रेणुका मातेच्या चरणी घातले.

जगताप यांनी केडगावच्या रेणुका माता देवी मंदिरात दर्शन घेतले. प्रभाग १७ मधील परिसरात प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला.

यावेळी माजी नगरसेवक मनोज कोतकर, सुनील कोतकर, जालिंदर कोतकर, पोपट कराळे, संजय लोंढे, मनोज कराळे, राजेश भालेराव, महेश गुंड, संभाजी सातपुते, साहेबराव विधाते उपस्थित होते.

जगताप म्हणाले, की शहर व केडगाव उपनगरमधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी कामे केली, त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान आहे. आनंदाने केलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान मला केडगावकरांनी दिले आहे.

यापुढील काळातही अशीच सेवा करण्याची संधी मिळावी, अशी प्रार्थनाही रेणुका माता चरणी केली आहे. केडगावमध्ये यापूर्वी अनेक कामे केली आहेत. रस्त्यांची कामे झाली आहेत. अजूनही खूप काही करणे शक्य आहे. केडगावकर माझ्यामागे कायम असतात, याचे समाधान वाटते.

केडगावचे प्रश्न सोडविले

जगताप यांनी केडगावचे मूलभूत प्रश्न सोडवण्याबरोबरच केडगावचे सर्व मुख्य रस्ता, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम, ड्रेनेज लाईन, पथदिवे, नियमित पाणीपुरवठा आदी प्रमुख कामे मार्गी लावली आहेत.

उद्याने, खेळाची मैदाने, मंदिराचे सुशोभीकरण, युवकांच्या रोजगारीचा प्रश्न जगताप यांच्या विकास कार्यातून सुटल्यामुळे केडगावमधील नागरिक सुखाने रहात आहेत.

याशिवाय नागरिकांच्या संकट काळत जगताप हे २४ तास उपलब्ध होते. केडगावकर जगताप यांच्या पाठीशी उभे राहतील, असे माजी नगरसेवक जालिंदर कोतकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT