पवित्र पोर्टल वरील शिक्षक भरती पुन्हा एकदा न्यायालयाच्या कचाट्यात अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पवित्र पोर्टल वरील शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र असून हे पसंतीक्रम जनरेट न झाल्याने राज्यातील अभियांत्रिकी व बीसीए पदवीधारक उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणामुळे शिक्षक भरती प्रक्रियेवर स्थगिती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या याचिकेमध्ये पात्र उमेदवारांना तातडीने पसंतीक्रम जनरेट करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
बी. ई, बी.एड, सी-टीईटी व टेट अशी पात्रता असूनही अनेक उमेदवारांना पवित्र प्रणाली मध्ये नमूद नसल्याने पसंतीक्रम जनरेट झाले नाही. आतापर्यंत झालेल्या दोन वेळच्या शिक्षक भरती प्रक्रियेत गणित विषयासाठी संधी नाकारल्याने अभियांत्रिकी उमेदवारांनी यापूर्वी सर्किट बेंच मध्ये धाव घेतली होती. त्यावर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने 15 डिसेंबर 2023 रोजी संबंधित विद्यार्थ्यांना गणित विषयांसाठी पात्र असल्याची शिफारस केली होती.
मात्र 2022 च्या शिक्षक भरती मध्ये पात्र अभियांत्रिकी उमेदवारांना कागदपत्र पडताळणीतून हकलपट्टी केल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांना संधी दिली नाही म्हणून प्रशासनाला या याचिकेमध्ये दिलेल्या मुद्द्यांवरून फटकारले आहे. त्या संदर्भात पुढील सुनावणी आता 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये या याचिकेवर पुढील सुनावणी 5 सप्टेंबर रोजी होणार आहे.
2022 च्या भरती प्रक्रियेत या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला होता असा दावा करण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेत देखील पसंतीक्रम येत नसल्याने या भरतीला देखील अनेक उमेदवार मुकणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून पसंतीक्रम जनरेट करून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.