Balasaheb Patil News : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी आज अचानक पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय देशासाठी दुर्दैवी असून प्रत्येक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणारा आहे. त्यामुळे शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी भूमिका आमदार बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांनी घेतली आहे.
राष्ट्रवादी भवनात आज आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले,‘‘शरद पवार यांनी ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अचानक पक्षीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. यामुळे कार्यकर्तेही आवाक् झाले. त्यावेळी हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मागणी केली.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पवार यांची भेट घेवून हा निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. शरद पवार यांचा निर्णय देशाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. ते राजकारणात, समाजकारणात प्रचंड सक्रिय आहेत. भाकरी फिरवण्याबाबत ते फक्त मुंबईच्या पदाधिकाऱ्यांविषयी बोलले होते.
महापालिकेच्या दृष्टीने नवे चेहरे आणण्यासाठी हे वक्तव्य होते. शरद पवार यांच्या निर्णयाबाबत लोकांच्या भावना तीव्र आहेत. त्यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, असेही बाळासाहेब पाटील म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीत अजित पवार यांची कुठलीही वेगळी भूमिका नाही. राज्यातील काही भागात कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर लावले होते. ती भूमिका अजित पवार यांची नसून राष्ट्रवादीत कुठलेही गट-तट नसल्याचे स्पष्टीकरणही आ. पाटील यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.