Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या मागे राज्यातील जनता उभी राहील...

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना पोलिसांनी दिलेल्या नोटीस संदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - राज्यात महायुतीच्या सत्ता काळात तत्कालीन मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांत भ्रष्टाचार केल्या बद्दल पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना पोलिसांनी दिलेल्या नोटीस संदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ( People of the state will stand behind Devendra Fadnavis ... )

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्‍यातील बदल्‍यांच्‍या संदर्भात भ्रष्‍टाचार उघड केल्‍याबद्दल पोलिसांनी दिलेली नोटीस म्‍हणजे चोराच्‍या उलट्या बोंबा अशीच परिस्थिती महाविकास आघाडीची आहे. भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधातील लढाईत फडणवीसांच्‍या पाठीशी भाजपच्या कार्यकर्त्यांसह राज्‍यातील जनता खंबीरपणे उभी राहील. महाविकास आघाडी सरकारच्‍या कृत्‍याचा निषेध करतानाच महाविकास आघाडी सरकारच्‍या भ्रष्‍टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्‍यासाठीची लढाई अधिक तीव्र करण्‍याचा इशारा त्‍यांनी दिला.

आमदार विखे पाटील पुढे म्हणाले की, आघाडी सरकारच्‍या मंत्र्यांनी केलेल्‍या भ्रष्‍टाचाराची सर्व प्रकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बाहेर काढत आहेत. एकापाठोपाठ एक मंत्री तुरुंगात जात आहे. आणखी किती मंत्र्यांचे नंबर आहेत माहीत नाही, त्‍यामुळे सैरभैर झालेल्‍या महाविकास आघाडी सरकारच्‍या नेत्‍यांनी जाणीवपुर्वक फडणवीस यांना लक्ष करुन, त्रास देण्‍याचा प्रयत्‍न सुरु केला आहे. या लढाईत संपूर्ण भाजपचे कार्यकर्ते त्‍यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे असल्‍यामुळे महाविकास आघाडीचे मनसुबे यशस्‍वी होणार नाहीत, असे विखे पाटील म्‍हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी आधी नोटीस पाठविणे म्‍हणजे त्‍यांच्‍या विशेष आधिकारांवरच गदा आणण्‍यासारखे आहे. यावर सामान्‍य प्रशासन विभाग एवढा अंधारात कसा? नोटीस देण्‍याच्‍या पोलिसांच्‍या कृत्‍याचा भाजपने तीव्र शब्‍दात निषेध केला.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्‍या भ्रष्‍टाचाराची प्रकरणं यापुढेही बाहेर काढणार असून, भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधातील या लढाईपासुन भाजप कदापिही मागे हटणार नाही अशा कितीही चौकशा केल्‍या तरी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाविकास आघाडीच्‍या विरोधात ही लढाई सुरूच ठेवतील, असा इशारा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT