Phaltan APMC News : एकीकडे टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले असताना सातारा जिल्ह्यातील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र, योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. याचा कारणास्तव चिडलेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान फलटण बाजार समितीने समितीच्या आवारात गोंधळ घातला म्हणून संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. फलटण बाजार समितीत राष्ट्रवादीचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाची सत्ता आहे.
सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. तर बाजार समितीत टोमॅटोला दलालांकडून कमी भाव दिला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूकही करण्याचे प्रकार होत आहे. असाच प्रकार फलटण बाजार समितीत Phaltan APMC घडला आहे. टोमॅटोला Tomato योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने आत्महत्येचा Farmer suicide प्रयत्न केला.
सागर देशपांडे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. तो टॉमेटोची काही कॅरेट घेवून बाजार समितीमध्ये आला होता. यावेळी त्याला बाजार समितीमध्ये दलालाकडून 60 किलोचा भाव देण्यात आला. या शेतकऱ्याने काही नागरिकांना बाजार समितीत आणलेला माल फुकट देखील वाटून टाकला.
यावर चिडलेल्या या शेतकऱ्याने बाहेर रस्त्यावर किरकोळ विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना 60 रुपये पावशेर टॉमेटोला भाव मिळतो, मग आमच्या टॉमेटोला किलोला 60 रुपये भाव देवून आमची चेष्टा केली जाते आहे, असा आरोप करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या शेतकऱ्याने काही नागरिकांना बाजार समितीत आणलेला माल फुकट देखील वाटून टाकला. आज शेतात काम करणाऱ्या महिलांची मजुरी देण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याचे या शेतकऱ्याने सांगितले आहे. दरम्यान फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार समितीत गोंधळ घातला म्हणून या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.