फलटण शहर : धुमाळवाडी (ता. फलटण) येथे पाठलाग करुन पकडलेल्या संशयित आरोपींकडून एकूण दहा गुन्हे उघडकीस आणण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तीन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून सात लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
श्रेयस उत्तम नाळे (रा. दुधेबावी ता. फलटण), अमित विठ्ठल हुंबे (रा. धुमाळवाडी ता. फलटण), गणेश अरुण जगदाळे (रा. मोगराळे ता. माण) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या सुचनेनुसार पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार सायकल चोरीस आळा घालण्यासाठी विशेष पथक तयार केले होते.
या पथकास मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धुमाळवाडी (ता. फलटण) येथे श्रेयस नाळे, अमित हुंबे, गणेश जगदाळे यांना मुसळधार पावसात व ओढ्यातील पुराच्या पाण्यातून पाठलाग करुन पकडले. याबाबत पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतू, नंतर फलटण तालुक्यासह मुंबई, पुणे शहर, खेड शिवापुर, शिरवळ, इंदापुर या ठिकाणाहून एकूण नऊ मोटार सायकली चोरल्याचे व एक शेतीमध्ये औषध फवारणीसाठी लागणारा एच.टी.पी. पंप चोरल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्यांच्याकडून सहा लाख ६५ हजार किंमतीच्या नऊ मोटार सायकली व एक औषध फवारणी पंप व गुन्ह्यात वापरलेली ऐंशी हजार रुपये किंमतीची मोटार सायकल असा एकूण सात लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. सदर संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त पोलिसांनी व्यक्त केली असून त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. सदर कारवाईत सहायक पोलिस निरिक्षक अक्षय सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहा. पोलिस फौजदार भिकू राऊत, पोलिस हवालदार प्रकाश खाडे, पोलिस नाईक अभिजीत काशिद, वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल महेश जगदाळे, विक्रम कुंभार, सचिन पाटोळे, निखील गायकवाड यांचा सहभाग होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.