Gambling  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजप शहराध्यक्षाच्या घरातच जुगार अड्डा; पोलिसांनी छापा टाकताच उडाली खळबळ

भाजप (BJP) शहराध्यक्षाच्या घरातच जुगार अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सरकारनामा ब्युरो

अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी (Police) जुगार अड्ड्यावर (Gambling) टाकलेल्या छाप्यात जिल्हा परिषदेच्या शाळेचा शिक्षकच सापडला होता. आता तर भाजप (BJP) शहराध्यक्षाच्या घरातच जुगार अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या नेत्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर ही बाब उघडकीस आली. दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधनी येथे ही घटना घडली आहे.

या छाप्यात 4 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 67 हजार रुपये, जुगाराचे साहित्य आणि वाहनांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या नेत्याचे नाव सातलिंग ऊर्फ अप्पू सैदप्पा परमशेट्टी (रा.दुधनी) असे आहे. त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या खोलीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पैशावर पैजा लावून हे सगळे मन्ना नावाच्या जुगार खेळत होते.

या कारवाईत नागप्पा दत्तप्पा व्हंडारी, इष्टलिंगप्पा श्रीशैल अमाणे, नामदेव पांडू राठोड, सय्यद हब्बूसो बळुरगी, हुसेन दस्तगीर नदाफ, चंद्रकांत मलकण्ण दिंडोरे, गुरूराज भीमराव उडगी, परमेश्वर सिद्धुप्पा धोत्रे, राजीव गोविंद राठोड, पुरू हरिश्चंद्र राठोड, सातलिंग ऊर्फ अप्पू सैदप्पा परमशेट्टी यांना पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप काळे आणि त्यांच्या पथकाने केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT