Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मेडिकल कॉलेजच्या कामात हस्तक्षेप खपूवन घेणार नाही... शंभूराज देसाई

पोलिसांच्या Police १४ हजार पदांची भरती Recruitment of 14 thousand postsलवकरच करण्यात येणार आहे. यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही.

Umesh Bambare-Patil

सातारा : सातारा शासकिय मेडिकल कॉलेजच्या मान्यतेसाठी कोणत्याही पक्षाचे नव्हे तर शासनाचे मोठे योगदान आहे. या कॉलेजचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार असून या कामात कोणीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास ते खपवून घेणार नाही, असा इशारा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात मेडिकल कॉलेज, जलसंपदा विभागातील प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाची मंजूर कामे यासंदर्भातील आढावा बैठक मंत्री देसाईंच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शंभूराज देसाई म्हणाले, साताऱ्यात शासकिय मेडिकल कॉलेज होत आहे. याबाबतच्या मुनष्यबळाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवला आहे. अर्थसंकल्पात बांधकामासाठी निधीची तरतूदही केली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भूमीपूजन करण्यात येणार आहे. आता १०० जणांची बॅच आहे. दुसरी बॅचही लवकरच येईल. यापुढे मेडिकल कॉलेजच्या कामाला गती देण्यात येणार आहे. त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करू.

प्रस्तावित मेडिकल कॉलेजचे श्रेय अनेक पक्ष घेत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर शंभूराज देसाई म्हणाले, शासनाने सातारा जिल्ह्यासाठी या मेडिकल कॉलेजला मान्यता दिली आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाचे नव्हे तर शासनाचे मोठे योगदान आहे. या कॉलेजचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार असून या कामात कोणीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास ते खपवून घेणार नाही.

जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून संबंधित पदे केव्हा भरणार, या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, राज्य शासनाने राज्यात ७५ हजार पदे भरण्यास मान्यता दिली असून मी स्वत: सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील रिक्त आरोग्य पदे भरण्याबाबत त्यांना विनंती केली आहे.जिल्हा रुग्णालयाबाबात काही तक्रारी आहेत. त्याविषयी जिल्हाधिकारी माहिती घेतील. त्यानंतर आम्ही दोघेही रुग्णालयाला भेट देऊ.

सैनिक स्कूलच्या कामाचे टेंडरही लवकरच काढण्यात येणार आहे. पोलिसांच्या १४ हजार पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे. यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही. आता येत्या काही दिवसांतच शिंदे गट मोठा करायचा आहे. त्यामुळ नव्याने येणाऱ्यांचे नेहमीच स्वागतच राहिल. त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक शिंदे गट आणि भाजप एकत्र लढविणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे.

जलसंपदा विभागाचे काही मोठे प्रकल्प आहेत. धोम-बलकवडी आणि जिहे-कठापूर योजनेला गती देणार आहोत. भूसंपादनाचा विषय थांबला असून जिल्हाधिकारी तो मार्गी लावतील. वाटाघाटीने जमिनी घ्यायच्या झाल्या तर त्यासाठी पैसे देण्यात येतील. कृष्णा खोरेमधील कामांना गती देण्यासाठी महिन्यातून एक बैठक घेऊ. पण, ठेकेदारांमुळे कामांना विलंब होणार असेल तर त्यांना काळ्या यादीत टाका, अशी सूचना शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT