Udayanraje - Shivendraraje Dispute Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje - Shivendraraje Dispute: साताऱ्यात राजकारण तापलं; बाजार समितीच्या जागेवरून उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे भिडले

सरकारनामा ब्यूरो

Satara Bazar Samiti News : छत्रपती शाहू फळे, फुले व भाजीपाला मार्केट कमिटीच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजनावरून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समोरासमोर भिडले. मार्केट कमिटी चोर है...अशी घोषणा उदयनराजे (Udayanraje Bhosale) समर्थकांनी दिल्या तर दुसरीकडे एक नेता एक आवाज शिवेंद्रबाबा अशी घोषणा आमदार समर्थक देत होते. या गोंधळात शिवेंद्रराजे यांनी भूमीपूजनाचा नारळ फोडला. त्यामुळे दोन्ही बाजूने कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

याच वेळी जागेचे मालक आणि कुळांनी जागेवर बैठक मांडून आमच्यावर अन्याय नको अशी मागणी केली. तसेच मार्केट कमिटी चोर आहे अशी घोषणाबाजी केली, यानंतर दोन्ही राजे एकमेकांच्या समोर उभे राहून युक्तिवाद करत राहिले, वहिवाट दार यांची जागा असून याची कोणतीही परवानगी आमदार गटाने घेतलेली नाही. त्यामुळे हे भूमिपूजन बे कायदेशीर आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही या जागेचा सातबारा मार्केट कमिटीच्या नावावर झाला आहे. खासदार गट कडे कायदेशीर कागदपत्रे असतील तर दाखवावी, अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी केली. याच वेळी समर्थकांची घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे एकच गोंधळ सुरू झाला. या वादात च आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivenddraraje Bhosale) यांनी मार्केट कमिटीच्या नूतन इमारतीचा भूमीपूजनाचा नारळ फोडला.

त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. तसेच कुळांनी आमची जागा असून येथे कोणी पाय ठेऊ नका अशी भूमिका घेत दोन्ही राजांच्या समोर ठिय्या मारला.त्यांनी आमदार व मार्केट कमिटीच्या निषेध केला. (Satara Politics)

पोलिसांनी दोघांतील वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही राजे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. हा वाद सुरू असतानाच आमदार समर्थक आणि मार्केट कमिटीच्या संचालकांनी त्याच जागेत पुन्हा नारळ फोडला व भूमिपूजन करून फटाक्यांची आताश बाजी केली. त्यानंतर दोन्ही राजांनी आपली भूमिका मांडली, तेही एकमेकांच्या समोरच उभेराहून. त्यानंतर संभाजीनगरच्या ग्रामपंचायत च्या सदस्यांनी त्याच जागेत उदयनराजे यांच्या समोरच ग्रामपंचायतीच्या विकास कामांचा नारळ फोडला. त्यावेळी उदयनराजे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT