MLA Jaykumar Gore, Rahul Kool, Nitin Gadkari  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan : म्हसवड-पंढरपूर महामार्गाचे निकृष्ट काम; आमदार गोरेंची थेट गडकरींकडे तक्रार

मंत्री Central Minister गडकरी Nitin Gadkari यांनी सदर रस्त्याच्या कामाची तत्काळ चौकशी Immediate inquiry into road work करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना senior officers दिले.

विशाल गुंजवटे

बिजवडी : सातारा - म्हसवड - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्य चार वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून सध्या झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची चौकशी करुन संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी केंद्रीय वहातूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली. मंत्री गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

सातारा - म्हसवड - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरुवातीपासूनच अनेक कारणांनी चर्चेत राहिले आहे. या रस्त्याच्या कामातील दिरंगाईबाबत अनेक ठिकाणी अनेक आंदोलनेही करण्यात आली होती. गेल्या चार वर्षांपासून या रस्त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी अधिवेशनातही या रस्त्याच्या निकृष्ट आणि धिम्या कामाबाबत आवाज उठवला होता.

नुकतीच त्यांनी दिल्लीत केंद्रीय वहातूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटून साताऱ्यापासून कोरेगाव तसेच पुढे पुसेगावपर्यंत आणि माण तालुक्यातील म्हसवड व पुढे पंढरपूरपर्यंत या रस्त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने आणि निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक अपघात होवून अनेकांचे बळी गेले आहेत, असे सांगितले. या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करुन संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी दौंडचे आमदार राहूल कुल उपस्थित होते.

मंत्री गडकरी यांनी सदर रस्त्याच्या कामाची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. आमदार गोरेंनीही रस्त्याच्या निकृष्ट कामाचे फोटो आणि व्हिडिओ शुटींग अधिकाऱ्यांकडे द्यावे असेही गडकरींनी सांगितले. दिल्ली येथे मंत्री गडकरी यांच्या निवास्थानी झालेल्या भेटीत आमदार गोरे यांनी माण - खटावच्या विविध विकासकामांबाबत चर्चा केली. मतदारसंघात केंद्रीय रस्ते निधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली. मंत्री गडकरी यांनी तसे प्रस्ताव सादर करण्याची सुचना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT