prajakt tanpure Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

प्राजक्त तनपुरे म्हणाले, विरोधकांच्या ईडीला विकास कामांतून उत्तरे देणार...

ऊर्जा व नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्या मालमत्तांवरही ईडीने कारवाई केली होती.

विलास कुलकर्णी

राहुरी ( जि. अहमदनगर ) - राज्यातील महाविकास आघाडीचे नेते व त्यांच्या संबंधित व्यक्तींवर सक्त अंमलबजावणी संचालनालयाकडून ( ED ) कारवाया सुरू आहेत. ऊर्जा व नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्या मालमत्तांवरही ईडीने कारवाई केली होती. याचा संदर्भ घेत मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली. ( Prajakt Tanpure said that he will give answers to the opposition's ED through development works ... )

प्राजक्त तनपुरे म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील विरोधक ईडीची भीती दाखविण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. तर, महाविकास आघाडी शासन विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. विरोधकांच्या ईडीला विकास कामांतून उत्तरे देणार आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

मंत्री तनपुरे पुढे म्हणाले की, राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 155 कोटी 59 लाखांची तांत्रिक समितीची मान्यता मिळाली आहे. योजनेत नव्याने 12 गावांचा समावेश केला आहे. योजनेत आता 43 गावे 186 वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून निविदा प्रक्रिया सुरू होईल, असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे यांनी माझ्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत सुमारे पंधरा बैठका घेऊन, योजनेतील त्रुटी दूर केल्या. या योजनेविषयी विधानसभेत पहिला लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. योजनेच्या वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी प्रयत्नशील आहे.

मुळा धरणातून योजनेसाठी उचललेले शंभर पैकी अवघे 25 लीटर पाणी पोचते. पंधरा-वीस दिवसांनी पाणी मिळते. योजनेच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होते. हे टाळण्यासाठी मुळा धरण ते जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान साडे सव्वीस किलोमीटर मुख्य जलवाहिनी जमिनीवर घेतली जाईल. चिचोंडी पासून तिसगावपर्यंत स्वतंत्र जलवाहिनी होईल. योजनेत खांडगाव, जोहारवाडी, सातवड, कवडगाव, त्रिभुवनवाडी, निंबोडी, देवराई, घाटशिरस, शिरापूर, करडवाडी, पवळवाडी, डमाळवाडी ही नवीन गावे समाविष्ट आहेत.

राहुरी तालुक्यातील सोनगाव-धानोरे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला सुद्धा 27 कोटींची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. राहुरी शहराच्या पाणी योजनेचे काम वेगाने प्रगती पथावर आहे. ब्राह्मणी व सात गावे योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेची मुख्य जलवाहिनी प्लास्टिक ऐवजी लोखंडी करून, चेडगाव व मोकळओहोळ या दोन गावांचा नव्याने समावेश केला आहे, असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT