Mumbai News, 29 Dec : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांनी मूक मोर्चा काढला होता.
तर या प्रकरण पहिल्यापासून उचलून धरणारे भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मोर्च्याच्या आदल्या दिवशी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. धस यांनी शुक्रवारी बीडचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंच्या इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सवर देखील प्रतिक्रिया दिली.
यावेळी त्यांनी काही महिला सेलिब्रिटींची नावे घेतली यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं (Prajakta Mali) देखील नाव घेतलं होतं. धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटलं असून धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने देखील पत्रकार परिषद घेत, सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली होती. तर यावर पुन्हा एकदा धस यांनी आपण माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
सुरेश धस म्हणाले, "मी प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नाही. माणूस आमचा गेला आहे. ज्याचे जळत त्यांना कळते. विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांचे आणि कोणाचे संबंध असे बोललो असेल तर संबंध शब्द परत घेतो. मैत्रीतून त्यांनी हे केले असावे. माझी चूक झाली नसल्याने मी माफी मागणार नाही."
दरम्यान, आता याच सर्व प्रकरणावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते पाटील म्हणाले, "आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीच चारित्र आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमी काळजी घेतली. त्यामुळे महिलेची बदनामी होईल असं बोलणं चाललं आहे. जो चाललाय तो एक राजकीय विषय आहे. तसाच सामाजिक आणि संवेदनशील देखील आहे.
मात्र, असं नाव जोडणं योग्य नाही. सुरेश धस माझे चांगले मित्र आहेत. मी काल गुजरातला गेलो होतो त्यांना दोनवेळा फोन केला पण लागला नाही. त्यांना मी आज सांगेन की महिलेची बदनामी होईल असं बोलणं योग्य नाही, त्यांना ते शोभत नाही. ते पार्टीचे कार्यकर्ते आहेत पार्टीत बोलायला पाहिजे, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.