Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आमचे मतदान आरक्षणवाद्याला...

सरकारनामा ब्युरो

उमेश मोरगावकर

पाथर्डी (जि. अहमदनगर ) - मढी ( ता. पाथर्डी ) हे ठिकाण भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. याच गावात काल ( मंगळवारी ) आदिवासी, भटके विमुक्त समाजातील कार्यकर्त्यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरात झाले. या शिबिर प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी राज्यातील आरक्षणावरील तिढ्यावर बोलताना आगामी निवडणुकांविषयी आदिवासी व भटक्या विमुक्त समाजाला मार्गदर्शन केले. ( Prakash Ambedkar said, our vote is for reservationists ... )

प्रशिक्षण शिबिरात रेखा ठाकूर, प्रा. अंजली आंबेडकर, प्रा. किसन चव्हाण, ॲड. डॉ. अरुण जाधव, प्रा. विष्णू जाधव, केशव मुद्देवाड, डॉ. धर्मराज चव्हाण, बालाजी शिंगे, अनिल मोरे, दगडू गायकवाड, मोहन राठोड, अमरसिंह चव्हाण, गजानन गिरी, अंकुश बलिया, बाबुराव फुलमाळी, भिमराव चव्हाण, द्वारका पवार, अनिल जाधव, डॉ. जालिंदर घिगे हे उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आम्ही आमचे आरक्षण घालविणाऱ्या लोकांना मतदान करणार नाही तर आमचे मतदान आरक्षणवाद्याला असेल असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, इथल्या राज्यकर्त्यांनी ओबीसी, मुस्लिम, भटके विमुक्त समाजाने आरक्षणाच्या प्रश्नावर ताकदीने आपले मत मांडले पाहिजे. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपले मत आरक्षण वाद्याला हे ज्या दिवशी आपण ठरवू त्या दिवशी आपल्याला कोणासमोर ही झोळी घेऊन जाण्याची गरज जाण्याची पडणार नाही.

सत्ता ही विकासाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपण सत्ता काबीज करून विकासाकडे वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आतापासूनच प्रचाराला लागा आज ओबीसी चे राजकीय आरक्षण गेले, उदया शैक्षणिक आरक्षण गेले तर काय होईल. आपला हा लढा उद्याच्या पिढीला स्वतंत्र ठेवण्याचा आहे. हा स्वतःचा लढा यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध होऊ आणि आरक्षण वाद्यालाच मतदान करा असे आवाहन त्यांनी या वेळी केले. विष्णू जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक तर किसन चव्हाण यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT