Prakash Solanke, Dhananjay Munde & Chhagan Bhujbal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solanke Vs Bhujbal Politics: प्रकाश सोळंके यांनी छगन भुजबळांच्या मर्वावरच बोट ठेवले, धनंजय मुंडेंचाही घेतला समाचार!

Prakash Solanke's reply to Chhagan Bhujbal, resign from the ministerial post and get it, no more moral talk-राज्याच्या मंत्रिमंडळात राहून छगन भुजबळ मंत्रीमंडळ आणि उपसमितीच्या निर्णयाला कसा विरोध करू शकतात?

Sampat Devgire

Prakash Solanke News: मंत्री छगन भुजबळ यांनी बीड येथे ओबीसी मेळावा घेतला. यावेळी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली.

आमदार प्रकाश सोळंके यांनी ओबीसी मेळाव्याबाबत मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या टीकेला उत्तर दिले. धनंजय मुंडे यांनी आत्मपरीक्षण करावे. नंतर इतरांना सल्ला द्यावा. मराठा समाजाला सल्ला देण्याची त्यांची किंचितही कुवत नाही, असे आमदार सोळंके म्हणाले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत. मुख्यमंत्री आणि कॅबिनेटने घेतलेला हैदराबाद जीआर चा निर्णय त्यांना मान्य नाही. असे असेल तर त्यांनी आधी नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे, असे सोळंके म्हणाले.

मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. समाजाला आरक्षणाची गरज आहे. राज्यभरात कुणबी मराठा यांना जातीचे दाखले मिळत आहे. प्रश्न फक्त मराठवाड्याचा होता. तो मुख्यमंत्र्यांनी सोडवला आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुसह्य झाला.

मंत्री भुजबळ हे नैतिकतेच्या गप्पा मारतात. त्यांना तो अधिकार अजिबात नाही. ते मंत्रिमंडळात आहेत तरीही अशी भाषा करता. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाने आणि उपसमितीने याबाबत निर्णय घेतला आहे, याचे स्मरण भुजबळ यांना नाही की काय?.

मुख्यमंत्र्यांनी मनोज सारंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर हैदराबाद जीआर अंमलबजावणीचा निर्णय घेतला. तो मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. तो मंत्री भुजबळ यांना कसा मान्य होत नाही?. मान्य होत नसेल तर तुम्ही ताबडतोब मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. मंत्री पद सोडल्यावरच मेळावे घ्यावेत, या शब्दात सोळंके यांनी भुजबळ यांना सुनावले.

आमदार धनंजय मुंडे हे कसे निवडून आले? हे सगळ्यांना माहित आहे. त्यांनी माझ्या विरोधात दोन ओबीसी उमेदवार दिले होते. नवराई मतदार संघातही हाच प्रयोग केला. सुरेश धस यांच्या विरोधातही उमेदवार दिले. तरीही ते नैतिकतेच्या गप्पा मारीत आहेत.

धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाला शहाणपण शिकवण्याची गरज नाही मराठा समाज सुजाण सुशिक्षित आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे संघर्षशील नेतृत्व या समाजाकडे आहे. त्यामुळे तुम्ही सल्ला देण्याची आवश्यकता नाही.

धनंजय मुंडे निष्ठेच्या गप्पा मारतात. आज पर्यंत त्यांनी कोणाशी निष्ठा ठेवली आहे? असा प्रश्न सोळंके यांनी केला. या निमित्ताने बीड येथील मंत्री भुजबळ आणि नेत्यांच्या उपस्थितीत झालेला ओबीसी मेळावा नव्या राजकीय वादाला कारण ठरले आहे. आगामी काळात त्याला कोणते वडण मिळते याची आता उत्सुकता आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT