Kolhapur News, 11 Apr : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडीत होता. अखेर त्याला जामीन मिळाल्यामुळे त्याची आज सुटका होणार आहे.
बुधवारी जामीन मिळाल्यानंतर कारागृहाला उशिरा आदेश मिळाल्याने कोरटकरचा कोठडीतील मुक्काम दोन दिवस वाढला होता. आदेश ग्रहण करणाऱ्या कोर्टाला सुट्टी असल्याने कोरटकरची आज सुटका होणार आहे. मात्र, कोरटकरची सुटका होणार असल्याने शिवप्रेमींच्या भावना संतप्त आहेत.
बुधवारी कोरटकरला जामीन मंजूर झाल्यानंतर कळंबा कारागृहासमोर शिवप्रेमींची गर्दी झाली होती. कोल्हापूर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून कळंबा कारागृहासमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान आज कोणत्याही क्षणी पोलिस कोरटकरला पोलिस बंदोबस्तात जिल्ह्याबाहेर सोडण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून बुधवारी 9 मार्चला दिलासा मिळाला होता.
13 मार्चला न्यायालयीन कोठडी संपत असताना कोरटकरला बुधवारी न्यायालयाकडून अटी आणि शर्ती घालत जामीन मंजूर करण्यात आला. पन्नास हजार रुपयांचा जात मुचलका आणि तपासासाठी ज्या ज्या वेळी पोलिस बोलावतील त्या त्यावेळी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हजर राहणे. फिर्यादी आणि साक्षीदार यांना धमकवायचं नाही. या प्रमुख तीन अटींवर कोरटकरला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे
25 फेब्रुवारी रोजी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी दिल्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात कोरटकर याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंतर त्याला 25 मार्च रोजी तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथून अटक करण्यात आली होती.
तर न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर तपासासाठी पोलिसांनी 30 मार्चपर्यंत कोठडीची मागणी केली होती. त्यानंतरच्या सुनावणीत कोरटकरला 13 एप्रिल पर्यंत कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.