Prashant Paricharak supporters Meeting
Prashant Paricharak supporters Meeting Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘दामाजी’च्या निवडणुकीत आम्हाला कुणी गृहीत धरू नये : परिचारक समर्थकांचा आमदार आवताडेंना इशारा

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी कारखाना प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी एक आदर्श कारखाना म्हणून चालविला आहे, त्यामुळे एकहाती सत्ता असल्याशिवाय दामाजी सहकारी साखर कारखान्यास भवितव्य राहणार नाही. आता आम्हाला दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत कुणीही गृहीत धरु नये, असा इशारा परिचारक गटाचे मंगळवेढा येथील समर्थक युन्नुस शेख यांनी अप्रत्यक्षरीत्या विद्यमान अध्यक्ष आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांच्या गटाला दिला. (Prashant Paricharak supporters warn MLA Samadhan Avtade)

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत परिचारक गटाची बैठक आज (ता. १५ मे) पार पडली. त्यामध्ये हा इशारा देण्यात आला. या वेळी शिवानंद पाटील, औदुंबर वाडदेकर, रामकृष्ण नागणे, जगन्नाथ कोकरे, एकनाथ होळकर, राजेंद्र चरणू पाटील, बापुराया चौगुले, शिवाजीराव नागणे, नामदेव जानकर, नेमिनाथ आकळे, काशीनाथ पाटील, रामभाऊ माळी, नंदकुमार हावनाळे, मुझप्फर काझी, जयंत साळे, गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, अशोक माळी यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवानंद पाटील म्हणाले, दामाजी साखर कारखाना ज्या ज्या वेळी अडचणीत आला, त्या त्या वेळी (स्व.) सुधाकरपंत परिचारक आणि प्रशांत परिचारक यांनी मदत केली आहे. ही निवडणुक कारखान्याची असून संस्थात्मक कारभार परिचारक मालकांशिवाय कोणीही करू शकणार नाही. औदुंबर वाडदेकर म्हणाले की, राज्यातील मंत्रिमंडळातील अर्धे डझन मंत्री तळ ठोकून असताना पोटनिवडणुकीत परिचारक मालकांनी रात्रीचा दिवस करुन समाधान आवताडे यांना विजयी केले.

राजेंद्र पाटील म्हणाले, दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण न आणता स्वतंत्र पॕनेल करावा. कारखान्याच्या १९ हजार सभासदांना अक्रियाशील ठरविणे व १८०० जुन्या सभासदांना अपूर्ण शेअर्सपायी कमी करणे, हे आम्हाला कदापी मान्य नाही. या वेळी काशिनाथ पाटील, सिध्देश्वर कोकरे, सुधीर करंदीकर, संतोष मोगले, हरीभाऊ यादव, मधुकर चव्हाण, विठ्ठल सरगर, दिगंबर भाकरे, बाळासाहेब यादव, तानाजी पवार, संभा लवटे, शंकर आसबे यांची भाषणे झाली.

प्रशांत परिचारकांच्या भूमिकेकडे लक्ष

आजच्या बैठकीत बहुतांश परिचारक समर्थकांनी गृहीत न धरण्याचे बोलून दाखविले असले तरी निर्णयाचा अधिकार माजी आमदार प्रशांत परिचारकांवर सोपवला. ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य राहील, असे बोलून दाखवले. आजच्या बैठकीस प्रशांत परिचारक उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले होते, त्यामुळे परिचारक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण, परिचारक आजच्या बैठकीला अनुपस्थित होते. समाधान आवताडे यांना आमदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशांत परिचारक आता दामाजी कारखाना निवडणुकीत कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT