Shivendraraje Bhosale, Saurabh Shinde with Factory Director
Shivendraraje Bhosale, Saurabh Shinde with Factory Director Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jawali News : प्रतापगड कारखान्यामुळे जावलीत सहकारक्रांती : शिवेंद्रसिंहराजे

Umesh Bambare-Patil

Shivendraraje Bhosale News : अजिंक्यतारा कारखान्याने प्रतापगड कारखाना भागीदारी तत्वावर चालविण्यास घेतला असून कारखाना सुरु करून आगामी गळीत हंगामात चार लाख मे. टन उसाचे गाळप करून हंगाम यशस्वी होईल. प्रतापगड कारखान्यामुळे जावली तालुक्यात खऱ्या अर्थाने सहकारक्रांती घडेल, असा विश्वास अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.

प्रतापगड कारखान्याला उर्जितावस्था प्राप्त व्हावी, या कारखान्याच्या सभासद, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या हेतूने आणि सामाजिक बांधिलकी म्हणून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने प्रतापगड कारखाना १५ वर्षांच्या कालावधीसाठी भागीदारी तत्वावर चालविण्यास घेतला आहे.

प्रतापगड कारखाना सुरु करण्यापूर्वी कारखान्यातील मशिनरी दुरुस्ती आणि देखभालीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, प्रतापगडचे कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे यांनी सौरभ शिंदे व उपस्थित सर्व संचालक यांच्या समवेत कारखान्याची पाहणी केली. अजिंक्यतारा कारखान्याच्या सहकार्याने प्रतापगड कारखान्याला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त होईल आणि या संस्थेच्या माध्यमातून जावली तालुक्यातील शेतकऱ्यांना उभारी मिळेल, असे आ.शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT