Kolhapur News, 08 Oct : कागल विधानसभा मतदारसंघातील मुरगूड नगर परिषदेत गेल्या पंचवीस वर्षांपासून सत्ता असलेले राष्ट्रवादीचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्री यांचे खंदे समर्थक प्रवीण सिंह पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.
आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या भावाने नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर स्वतःची ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत माजी खासदार संजय मंडलिक यांचे मुरगुडचे माजी नगराध्यक्ष देखील मंत्री हसम मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपली बाजू भक्कम करण्यासाठी दुसऱ्या फळीतील पदाधिकारी आणि नेत्यांनी चांगलीच रणनीती आखली आहे. याचे उदाहरण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत असणारे प्रवीण सिंह पाटील यांनी मंगळवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीत नंतर पाटील यांचे राजकीय विरोधक असणारे राजेखान जमादार आणि बंधू रणजीत सिंह पाटील यांची मंत्री मुश्रीफ यांच्याशी जवळीकता वाढल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रवीणसिंह पाटील यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रवीण सिंह पाटील यांची बाजू भक्कम झाल्यानंतर जमादार आणि रणजीत सिंह पाटील यांनी देखील मुश्रीफ यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील व माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. उद्या (ता.09) सायंकाळी चार वाजता मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.
रणजितसिंह पाटील म्हणाले, 'माझी आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची स्वतंत्रपणे भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे मी कोणासोबत जाऊन त्यांच्या पक्षात प्रवेश करत नाही. ज्यावेळी मुश्रीफ यांच्यासोबत बैठक झाली, त्यावेळी त्यांनी तुमचे लहान बंधू सोबत असणार आहेत. ते तुम्हाला चालणार आहे काय? असा प्रश्न केला होता. त्यावेळी मी त्यांना ते तुमच्यासोबतच आहेत. त्यामुळे मला काहीही अडचण नाही,' असे सांगितले होते.
गेली 43 वर्षे गोकुळमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. जिल्हा परिषद, पंचायत समिती, शेतकरी संघ, ऑल इंडिया रेडिओ आदी ठिकाणी मी काम केले. ज्या ठिकाणी गेलो तिथे प्रामाणिकपणे राहिलो. गेल्या दहा वर्षांत काही कारणास्तव राजकारणापासून बाजूला राहावे लागले; पण त्यानंतर राजकारणाची बदललेली परिस्थिती बघता कागल तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय मी व माझ्या कार्यकर्त्यांनी घेतला.
हा निर्णय घेताना आम्ही त्यांच्याकडे कसल्याही पदाची अपेक्षा ठेवलेली नाही.’ राजेखान जमादार म्हणाले, 'आज सकाळी मला मंत्री मुश्रीफ यांचा फोन झाला. त्यावेळी त्यांनी मला माझा निर्णय विचारला. त्यावेळी मी त्यांना त्यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करण्याचे ठरवले.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.