Solapur, 18 May : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषद आणि महापालिकेने प्रत्येक सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ साजरा केला आहे. त्यानुसार महापौर विनायक कोंड्याल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर हे इलेक्ट्रीक गाडीवरून महापालिकेत, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य हे एसटी बसने आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन हे सायकलीने जिल्हा परिषदेत दाखल झाले.
इराण विरुद्ध अमेरिका, इस्त्राईल युद्धामुळे जगातील अनेक देशांत इंधन तुटवडा जाणवत आहे. तसेच महागाई वाढण्याची चिन्हे आहेत, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, परदेश दौरे आणि सोने चांदी खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार भाजप नेत्यांकडून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देताना सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेने प्रत्येक सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य हे बार्शी तालुक्यातील आपल्या गावावरून बार्शी शहरात इलेक्ट्रीक दुचाकीने दाखल झाले, त्यानंतर ते एसटी बसने सोलापुरात दाखल झाले.
उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन हे सायकलवरून जिल्हा परिषदेत दाखल झाले.
याशिवाय अनेक विभागाचे प्रमुखही सायकल आणि इलेक्ट्रीक दुचाकीवरून आपापल्या कार्यालयात पोचले होते. त्यामुळे सोलापूर झेडपी पदाधिकारी आणि आधिकाऱ्यांनी ‘नो व्हेईकल डे’ यशस्वी करून पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त आणि इंधन बचतीचा सोमवारी करून दाखवला आहे.
महापालिकेत ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम राबविण्यात आला. त्यानुसार महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर हे आज ई-बाईकवरून महापालिकेत दाखल झाले होते, तर सभागृह नेते नरेंद्र काळे हे सायकलवरून सभागृहात आले होते. अधिकारीही सायकल आणि ई-बाईकवरून आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.