Solapur Gramin Police  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tejaswi Satpute News: तेजस्वी सातपुतेंच्या 'ऑपरेशन परिवर्तन'ला पंतप्रधान पुरस्कार जाहीर

Opration Parivartan| पुढील महिन्यात २१ एप्रिल २०२३ रोजी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे

सरकारनामा ब्युरो

Solapur Gramin Police | केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी लोक प्रशासनातील उत्कृष्ट सेवेसाठी पंतप्रधान पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या ऑपरेशन परिवर्तनला जाहीर झाला आहे. तर लातूर जिल्ह्यातील आरोग्य वर्धिनी केंद्रातून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेलाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुढील महिन्यात २१ एप्रिल २०२३ रोजी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. (Prime Minister's Award announced for Tejashwi Satput's 'Operation Parivartan')

विशेष बाब म्हणजे, जिल्हा पातळीवरील नावीन्यपूर्ण उपक्रम या गटातून हा पुरस्कार जाहीर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ऑपरेशन परिवर्तनला जाहीर झाला आहे. सोलापूरच्या तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हा उपक्रम राबवला होता. त्यांच्या या उपक्रमाची थेट केंद्र सरकारनेच दखल घेतली आहे.तसेच, या पुरस्कारासाठी सोलापूर व लातूर या दोनच जिल्ह्यांची निवड झाली आहे. (Solapur Gramin Police)

तेजस्वी सातपुते यांच्या कालावधीत या पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्यात आले होते.गेल्या महिन्यात २ फेब्रुवारीला सातपुते यांनी तज्ज्ञ समितीसमोर तर १८ मार्चला केंद्रीय सचिवांसमोर या ऑपरेशन परिवर्तनचे सादरीकरण केले होते. या उपक्रमात जिल्ह्यातील हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री बंद करणे, त्यातून होणारी गुन्हेगारी रोखणे, तसेच, हे व्यवसाय करणाऱ्या लोकांचे समुपदेशन व पुनर्वसन करणे, या उद्देशाने सातपुते यांनी या ऑपरेशन परिवर्तनाची सुरुवात केली होती.

याशिवाय जिल्ह्यातील हातभट्टी बनवणाऱ्या व विकणाऱ्या गावांचा सर्व्हेही करण्यात आला होता. या सर्व्हेतून जिल्ह्यातील ६० गावांमध्ये हातभट्टी तयार करून १२४ गावांमध्ये विक्री होत असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर ग्रामीण पोलिस दलातील प्रत्येक अधिकाऱ्यांना यांपैकी एक गाव दत्तक देण्यात आले.

हा उपक्रम सुरु झाल्यानंतर १८ महिन्यांतच हा व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवस सुरु केला. शेती, मजुरी, पशुपालन, कपडे विक्री, किराणा दुकान, खासगी कंपनीत नोकरी या माध्यमातून या व्यवसायातील लोकांचे पुनर्वसन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या उपक्रमाची दखल घेत केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर या उपक्रमाचे कौतुकही केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT