Prithviraj Chavan, Bhagatsinh Koshyari sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : राज्यपालांचे नाव काढताच पृथ्वीराज चव्हाणांनी जोडले कोपरापासून हात

राज्यपाल Governer पदातून मुक्त करण्यासाठी ते अशी वक्तव्ये करताहेत. त्यामुळे वारंवार अशी वक्तव्य करत असावेत.

- सचिन शिंदे

कऱ्हाड : राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाबद्दल माझा त्यांना कोपरापासून नमस्कार आहे, अशी उपहासात्मक टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडात पत्रकार परिषेदत केली.

राज्यपालांच्या विधानाबाबत आमदार चव्हाण म्हणाले. राज्यपाल वारंवार वादग्रस्त विधाने करत आहेत. राज्यपालांना कोपरापासून नमस्कार करतो. त्यांना पुन्हा हिमाचल प्रदेशला जायचे आहे. त्यामुळे त्यांना राज्यपाल पदातून मुक्त करण्यासाठी ते अशी वक्तव्ये करताहेत. त्यामुळे वारंवार अशी वक्तव्य करत असावेत, त्यामुळे त्याबाबत अधिक बोलणे योग्य नाही.

नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती अशी झाली. या यात्रेदरम्यान नांदेड व शेगाव येथे दोन मोठ्या सभा झाल्या. देशाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात निघालेली ही एकमेव यात्रा असावी. किंबहुना जगात फार कमी स्वरूपात अशा स्वरूपाची यात्रा निघाली असेल. यात्रेमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाले आहेत.

महाराष्ट्र व कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ दिवस तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे ते निश्चितच महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करतील. याबाबत 2004 मध्ये महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेला दावा प्रलंबित आहे. त्या दाव्यावर कर्नाटक सरकारने 2014 साली प्रति दावा दाखल केला आहे. तो दावा ताकदीने लढण्यासाठी न्यायालयात राज्य सरकारने वकिलांची फौज तयार केली आहे. त्यामुळे आज रोजी कर्नाटक सरकार किंवा तेथील मुख्यमंत्री काय म्हणतात याला अर्थ नाही, 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT