Prithviraj Chavan Sarkarama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politics News : माजी मुख्यमंत्र्यांमुळे शेतकऱ्यांनी 17 वर्षांनी सोडला सुटकेचा नि:श्वास! नेमकं काय घडलं?

Prithviraj Chavan Helps Satara Farmers : साताऱ्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर 17 वर्षांनी हसू फुलले...

Vishal Patil

Maharashtra Politics News : सरकारी काम अन् सतरा वर्षे थांब असा अनुभव कराड तालुक्यातील शेरे गावच्या शेतकऱ्यांना आला. तत्कालीन आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी सुचविलेल्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने 2006 साली निर्माण केलेल्या पाणंद रस्त्यांचा प्रश्न तब्बल 17 वर्षांनी मार्गी लावला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

शेरे गावातून बाहेर निघण्यासाठी मुतालिक पाणंद रस्त्याची 2006 मध्ये निर्मिती झाली. त्याआधी कृष्णा नदीला आलेल्या महापुरात त्या गावातील चारपैकी तीन रस्ते पाण्याखाली गेले होते. पूर परिस्थितीमध्ये गावातून बाहेर निघण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुतालिक पाणंद रस्त्याची निर्मिती केली. रस्ता करतेवेळी रस्त्यालगतच्या शेतीच्या भूसंपादनाचा मोबदला देणार असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते.

या प्रश्नावर संबंधित शेतकरी गेली पंधरा वर्षे लढा देत होते. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे याकडे लक्ष वेधले. पृथ्वीराज चव्हाण यांनी शर्थीचे प्रयत्न करत हा प्रश्न 17 वर्षानंतर निकाली काढला. भूसंपादनाचा मोबदला मिळालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

2006 मध्ये कृष्णा नदीला पूर आल्यानंतर महापुराच्या पाण्याने गावाला वेढा घातला होता. गावातील चारपैकी तीन रस्ते पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे गावचा संपर्कही तुटला होता. अशीच आपत्कालीन परिस्थिती पुढील काळात उद्भवल्यास गावातून बाहेर निघण्यासाठी पर्यायी रस्ता करण्याच्या तत्कालीन आमदार विलासराव पाटील - उंडाळकर यांनी जिल्हा प्रशासनास सुचवले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यातून मुतालिक पाणंद हा रस्ता आकारास आला. पूर परिस्थितीमध्ये बाहेर निघण्यासाठी मुतालिक पाणंद ही छोटीशी पाणंद होती. ( Satara News In Marathi ) त्यातून रस्ता करण्यासाठी व पाणंद वाढविण्यासाठी पाणंद रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना शेतीचा वाटेत येणारा भाग देण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने विनंती केली. त्याकामी होणाऱ्या भूसंपादनाचा मोबदला देण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली आणि रस्ता तयार झाला.

त्यानंतर भूसंपादीत 70 गुंठे क्षेत्राच्या मोबदल्याचा प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित पडला होता. मात्र, चव्हाणांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर 17 वर्षानंतर हा प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार चव्हाण यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात याकामी निधीची तरतूद करून घेतली. भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळाला. आता रस्त्याचा प्रश्नही मार्गी लागल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT