Prithviraj Chavan In Pusesavali Villege sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pusesavali News : पृथ्वीराज चव्हाणांनी दिली पुसेसावळीस भेट; बाहेरच्या व्यक्तींमुळे गावचे वातावरण बिघडवू नका...

Prithviraj Chavan पुसेसावळीची बाजारपेठ जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेपैकी एक असून, गावात शांतता राखण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे, असेही चव्हाण म्हणाले.

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Pusesavali News : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीस (जि. सातारा) येथे भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. ग्रामस्थांनी बाहेरील व्यक्तींच्या प्रभावात येऊन गावातील वातावरण बिघडवू देऊ नये. सर्वांनी मिळून मिसळून राहावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan म्हणाले, ग्रामस्थांनी बाहेरील व्यक्तींच्या प्रभावात येऊन गावातील वातावरण बिघडवू देऊ नये. सर्वांनी मिळून मिसळून राहावे. पुसेसावळी Pusesavali Villege शांतता प्रिय गाव आहे. या गावाला क्रांतिवीरांचा इतिहास आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी या गावातील स्वातंत्र्य सैनिकांनी रक्त सांडले आहे. पुसेसावळीची बाजारपेठ जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेपैकी एक आहे. त्यामुळे या गावात शांतता राखण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे.

या वेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीतील घटनेत मृत्यू झालेल्या नूरहसन शिकलगार याच्या घरी भेट देऊन त्यांच्या आई-वडील व पत्नीची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले.

या वेळी चव्हाण यांनी पुसेसावळीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, मंडल अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून माहिती घेतली. या वेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रणजित देशमुख, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष निवास थोरात, अल्पसंख्याक विभागाचे राज्य उपाध्यक्ष झाकीर पठाण, फारुक पटवेकर, सुरेश पाटील, दत्तात्रय रुद्रके, रवी कदम, अरविंद लवळे, सुरेश पाटील, सूरज दळवी, विजय कदम आदींसह दोन्ही समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT