Priyanka Gandhi .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Priyanka Gandhi News : ज्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षातून काढले; त्यांच्यासाठीच प्रियांका गांधींनी विमानतळावर ताफा थांबवला

Kolhapur Congress Politics : महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या कोल्हापुरातील गांधी मैदानावर प्रचार सभेसाठी आल्या होत्या. निवडणुकीच्या निमित्ताने त्या पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या.

Rahul Gadkar

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानंतर नाराज झालेल्या काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्त्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तात्पुरता निलंबन केलं होतं. त्यानंतर बाजीराव खाडे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. अखेर त्यांच्यासाठी आज काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी कोल्हापूर विमानतळावर आपला ताफा थांबवला होता.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या वाहनांचा ताफा बाजीराव खाडे यांना पाहून अचानकपणे थांबला. गांधी यांनी बाजीराव खाडे यांची विचारपूस केली.मात्र, या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस (Congress) नेत्या शनिवारी (ता.16) कोल्हापुरातील गांधी मैदानावर प्रचारसभेसाठी आल्या होत्या. निवडणुकीच्या निमित्ताने त्या पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. शिर्डी येथून खासगी विमानाने दुपारी साडेचार वाजता कोल्हापूर विमानतळ येथे त्यांचे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी गांधी मैदान येथे सुरू असलेल्या सभेला उपस्थिती लावली.

तत्पूर्वी सभास्थळी जाण्यासाठी वाहनांचा ताफा विमानतळाच्या प्रवेशद्वाराबाहेर पडताना गांधी यांना बाजीराव खाडे दिसले. खाडे यांना पाहताच प्रियांका गांधी यांच्या वाहनाची गती संथ झाली. यावेळी खाडे हे प्रियांका गांधी यांच्या वाहनाजवळ गेले, तेव्हा कैसे हो अशा शब्दामध्ये गांधी यांनी विचारपूस केली. तसेच घर में सभी लोग कैसे है अशी विचारपूस करण्यात आली. त्यानंतर वाहनाचा ताफा गांधी मैदान येथील सभेच्या ठिकाणी मार्गस्थ झाला.

सांगरुळ येथील बाजीराव खाडे यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्टीय सचिव म्हणून त्यांनी केले होते. तसेच उत्तर प्रदेशमध्ये सहप्रभारी म्हणून काम पाहत असताना प्रियांका गांधी या प्रभारी म्हणून काम पाहत होत्या. त्यांच्यासोबत 4 वर्षे काम केल्याने त्यांचा व गांधी यांच्यासोबत संपर्क होता. प्रियांका गांधी यांच्यासोबत मी काम केल्यानं आज त्या कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर मी फक्त त्यांची भेट घेतल्याचे खाडे यांनी सांगितले.

प्रियांका गांधी यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी कोल्हापूरमध्ये सभा झाली. या सभेत गांधी यांनी भाषण करताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली. बाळासाहेबांचे नाव घेऊन दाखवा, असे चॅलेंज करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही बाळासाहेबांचे नाव घेतो पण तुम्ही त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला, असे प्रत्युत्तर दिले. त्याआधी प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातील महिलांची माफी मागितली.

पंतप्रधान निराशाजनक भाषणं देत आहेत. या मोठ्या लोकांच्याकडून अशा भाषणाच्या अपेक्षा नाही. त्यांची जी जबाबदारी आहे तेच त्यांनी बोलावं. मोदीजी भाषण करतात बाळासाहेबांचे नाव घ्या, असं सांगतात. ते बाळासाहेब ठाकरेंच नाव घेतात आणि त्यांच्यात मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांनी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT