Pune News : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपने ऐनवेळी धक्कातंत्राचा अवलंब करत शरद लाड यांच्याऐवजी स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली. त्यांनी सोमवारी पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात अर्जही दाखल केला. मात्र, लाड यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
भाजपच्या वाट्याला आलेल्या विधानपरिषदेच्या ३ जागांसाठी रविवारी उमेदवारांची घोषणा झाली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव, नागपूर पदवीधरमधून माजी आमदार सुधाकर कोहळे, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपने उमेदवारी दिली. पुणे पदवीधरमधून शरद लाड यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असतानाच ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला.
मात्र, त्यानंतरही शरद लाड हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय कार्यालयात पोहोचले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘पक्षानेच मला अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे,’ असे लाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपने स्मिता जाधव यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतरही लाड अर्ज का दाखल करत आहेत, याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
लाड यांनी अर्ज दाखल केल्यानंतर याबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान, लाड यांचा हा अर्ज कदाचित डमीही असू शकतो, असाही तर्क लावला जात आहे. ऐनवेळी स्मिता जाधव यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला किंवा काही तांत्रिक गोष्ट आली तर अडचण नको, म्हणून शरद लाड यांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या असाव्यात, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.