Kolhapur News, 17 Sep : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामधून इच्छुकांची बांधणी सुरू असतानाच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या माघारी संदर्भात सुतोवाच केलं आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामधून मोठ्या घडामोडी घडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापुरात असताना बोलत होते. पदवीधरच्या मागील चार निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. चंद्रकांत पाटील हे देखील अरुण लाड, सारंग पाटील आणि काहींच्या मदतीने निवडून आले होते.
पदवीधरच्या निवडणुकीत अरुण लाड यांनी भैय्या मानेंना शब्द दिला होता. भाजपकडून ही जागा आपल्याकडे घेणे हे आव्हान आहे, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले. अरुण लाड हे भाजप मध्ये गेले नाहीत. ते अजूनही राष्ट्रवादीमध्ये आहेत. त्यामुळे ही जागा अजून राष्ट्रवादीची आहे. भैया माने यांचे शैक्षणिक कामे चांगले आहे. राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे.
शिक्षक मतदार संघ हा भाजप मागतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिवटे यांच्यासाठी मागणी आहे. चिवटे यांचे समजूत काढू शकलो तर राष्ट्रवादी व भाजप अशी एक एक जागा झाल्यास दोन्ही जागांवर महायुतीचा विजय होईल, असे विधान मंत्री मुश्रीफ यांनी केले. गोकुळची निवडणूक बिनविरोध होईल असे मला वाटत नाही.
नेत्यांच्या दाव्या प्रति-दाव्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणे अशक्य आहे. पण महायुती म्हणून निवडणूक होईल आणि महायुतीच जिंकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोणतीही बैठक झालेली नाही. 7 ऑक्टोंबर पूर्वी ही बैठक होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा होईल. त्यानंतर त्याबाबत निर्णय होईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.