Political leaders Sharad Lad and Bhaiyya Mane emerge as key contenders for the Pune Graduates Constituency election, highlighting growing competition within the Mahayuti alliance. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLC Election : थेट फडणवीसांकडून उमेदवारी फायनल झालेल्या शरद लाड यांना धक्का : 'वनसाईड आमदारकीच्या' स्वप्नाला राष्ट्रवादीच्या शिलेदाराचा सुरुंग

Pune Graduates Constituency, Sharad Lad, Bhaiyya Mane: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजपचे शरद लाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भैय्या माने यांच्यात चुरस वाढली आहे. महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Rahul Gadkar

Pune Graduates Constituency : विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण शांत होत असताना आता पुढील काही महिन्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे बिगुल वाजणार आहे. यात पुणे पदवीधर मतदारसंघावर भाजपकडून शरद लाड यांचे नाव निश्चित मानले जाते. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांचे नाव फायनल झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीकडून तगड्या उमेदवाराची चर्चा नसल्याने ही निवडणूक भाजपसाठी वनसार्डड समजली जात आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भैय्या माने यांनी या उमेदवारीवर आपला दावा मजबूत केला आहे. माने हे पदवीधरच्या निवडणुच्या तयारीला लागले आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघावर महायुतीमध्ये भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचाही दावा आहे. अशात या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द घेऊन पदवीधर मतदारसंघाचे विद्यामान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश समारंभातच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांच्या उमेदवारीबाबत स्पष्टता दिली.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी तयारी सुरू केली. कोल्हापूर जिल्ह्यातून उच्चांकी पदवीधरांची नोंदणी केल्याचा दावा करत उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. येत्या तीन ते चार महिन्यात पदवीधरची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. यंदा या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटली आहे. अशातच भैय्या माने यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून उच्चांकी मतदारांची नोंदणी केली असल्याचा दावा करत उमेदवारीसाठी आग्रह असल्याचा दावा सरकारनामाशी बोलताना केला आहे.

उमेदवारीवरून पुन्हा संघर्षाची चिन्हे

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष सर्वश्रुत आहे. मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध भाजपचे काही नेते यांच्यातील संघर्षामुळे राजकीय वनवा पेटला आहे. अशातच पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय झालेली मतदार नोंदणी

कोल्हापूर जिल्हा

पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- ८०,१८०

शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी - ८,६३१

पुणे जिल्हा

पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- ५४,८१०

शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी - ९,७७८

सांगली जिल्हा

पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- ७०,७२०

शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी - ६,१३४

सातारा जिल्हा

पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- ३५,८७९

शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी - ८,४९२

सोलापूर जिल्हा

पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- ३०,४७२

शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी - ११,१९८

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT