Adnl Col. Jeevan Galande, Dr.Subhash Chavan
Adnl Col. Jeevan Galande, Dr.Subhash Chavan Pramod Ingale, Satara
पश्चिम महाराष्ट्र

Satara News: जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सकांना दमदाटी; साताऱ्यात एकावर गुन्‍हा

सरकारनामा ब्युरो

सातारा : जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयातील कक्षात जावून जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. सुभाष चव्‍हाण यांना काल दुपारी दमदाटी, धक्काबुक्की तसेच शिविगाळ केल्‍याप्रकरणी राहुल जगताप (रा. सातारा, पुर्ण नाव पत्ता नाही) याच्‍यावर सातारा शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याच प्रकरणातील संशयितावर आणखी एक लुटमारीचा गुन्‍हा देखील नोंदविण्‍यात आला आहे.

जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सकपदी डॉ. सुभाष जयसिंग चव्‍हाण हे कार्यरत असून ते त्‍याच ठिकाणच्‍या शासकीय निवासस्‍थानी राहण्‍यास आहेत. काल दुपारी चारच्‍या सुमारास ते कक्षात बसून शासकीय कामांचा निपटारा करत होते. यावेळी त्‍याठिकाणी राहुल जगताप हा आला. त्‍याने बाहेर थांबलेल्‍यांना दमदाटी करत त्‍यांच्‍याकडे असणारी कागदपत्रे फेकण्‍यास सुरुवात केली.

बाहेर गोंधळ घातल्‍यानंतर जगताप हा डॉ. चव्‍हाण यांच्‍या कक्षात आला. त्‍याने डॉ. चव्‍हाण यांना शिविगाळ, दमदाटी तसेच धक्काबुक्की करत कामात अडथळा निर्माण केला. आतील गोंधळ ऐकून जमलेल्‍या इतर कर्मचाऱ्यांनी जगताप याला त्‍याठिकाणाहून बाजूला नेले. याची तक्रार डॉ. चव्‍हाण यांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली असून जगतापवर शासकीय कामात अडथळा आणल्‍याचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याचा तपास उपनिरीक्षक बी.डी.मुसळे हे करीत आहेत.

याच राहुल जगतापने जिल्‍हा रुग्‍णालयाच्‍या आवारात थांबलेल्‍या कारंडवाडी (ता.सातारा) येथील मंगेश उमेश चव्‍हाण या टेम्‍पोचालकास शिविगाळ व मारहाण केली होती. मारहाण करत असतानाच राहुल जगतापने दारुसाठी पैसे मागत चव्‍हाण यांच्‍याकडील पाचशे रुपये हिसकावून नेले. याची तक्रार मंगेश चव्‍हाण यांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली असून जगतापवर जबरी चोरीचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याचा तपास सहायक फौजदार डी.जी.पवार हे करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT