Deepak Salunkhe-Babasaheb Karande-Ganpatrao Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola News : गणपतआबांच्या अंत्यविधीवेळी घडलेल्या प्रकाराबद्दल शेकाप नेत्याने मागितली जाहीर माफी

त्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार आणि देशमुख यांचे नातू अनितकेत देशमुख यांचा अवघ्या ७६८ मतांनी पराभव झाला होता.

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (जि. सोलापूर) : शेतकरी कामगार पक्षाचे (PWP) ज्येष्ठ नेते, माजी आमदार (स्व.) गणपराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या अंत्यविधीवेळी घडलेल्या प्रकाराबद्दल पक्षाच्या राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य बाबासाहेब कारंडे (Babasaheb Karande) यांनी दीड वर्षांनंतर माफी मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांची कारंडे यांनी जाहीर माफी मागितली आहे. (Pwp Leader apologized for incident that happened during the funeral of Ganpatrao Deshmukh)

सांगोला तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारप्रकरणी पाठीशी घालणारे अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी त्यांना निलंबित करण्यात यावे, यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कारंडे यांनी आबांच्या अंत्यविधीवेळी घडलेल्या प्रकाराबद्दल पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो, असे स्पष्ट केले.

माजी आमदार गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांच्या अंत्यविधीवेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे हे श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहिले होते. त्या वेळी शेकापच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी साळुंखे यांना बोलू दिले नव्हते. कारण, दीपक साळुंखे हे तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीत गणपतराव देशमुख यांच्यासोबत होते. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी शहाजी पाटील यांच्यासोबत युती केली होती. त्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार आणि देशमुख यांचे नातू अनितकेत देशमुख यांचा अवघ्या ७६८ मतांनी पराभव झाला होता. तो राग कार्यकर्त्यांच्या मनात होता. त्यातून हा प्रकार घडला होता.

आज पत्रकार परिषदेत बोलताना जलजीवनच्या कामाच्या राजकीयच नाही तर अधिकारी वर्गाचीही चौकशी झाली पाहिजे. मी आम्ही विकासकामांत राजकारण करत नाही, असे नमूद केले होते. त्यासंदर्भाने कारंडे यांना आबासाहेबांच्या अंत्यविधीवेळी साळुंखे यांना बोलू न देणे हे राजकारण नव्हते, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना कारंडे यानी साळुंखे यांची माफी मागितली होती.

कारंडे म्हणाले की, आबासाहेबांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमावेळी साळुंखे श्रद्धांजली वाहत असताना काहींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत आम्ही त्यावेळीही माफी मागितली होती. त्यानंतर आजही जाहीर माफी मागतो, असे सांगून त्यांनी साळुंखे यांची माफी मागितली. भ्रष्टाचार प्रकरणी झालेली पत्रकार परिषद साळुंखे यांच्या माफीमुळे चर्चेत राहिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT